Palgaon villagers protest in front of Ultratech Cement Company
कोरपना :- दोन दशकांपासून हक्काच्या व पक्का मुख्य रस्त्यासाठी पालगाव ग्रामस्थ शासन तथा अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर UltraTech Cement Company Awalpaur मध्ये दत्तक ग्राम असल्याने मुख्य रस्त्याची मागणी करीत आहे.
सिमेंट कंपनीच्या माईन्स गेट ते पालगाव पर्यंत चा रस्ता हा पूर्णता कच्चा असल्याने धूळ व पावसाळ्यात चिखलमय होतो.
गेल्या अनेक वर्षांपासून पालगाव वासियांना ये – जा करण्यासाठी नाहक त्रास करावा लागत आहे.
अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या माईन्स परिसराला हा गाव लागून असल्याने माईन्स मध्ये वारंवार होणाऱ्या ब्लास्टिंग मुळे गावाला येणाऱ्या काळात धोका होऊ शकतो,
सातत्याने होणाऱ्या ब्लास्टिंगने घरांना भेगा पढत असून गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न ही निर्माण होताना दिसून येत आहे. Palgaon villagers protest in front of Ultratech Cement Company
शासन तथा अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मॅनेजमेंटशी अनेकदा पत्र व्यवहार करुनही रस्त्याची मागणी पूर्णत्वास आली नसल्याने, व रस्त्याचे काम करण्यासाठी दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने,
आज सकाळ पासून पालगाव ग्रामस्थांनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुख्य कार्यालया समोर ठिय्या मांडला असून, काय तोडगा निघाला नसल्याने गावकऱ्यांनी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या प्रवेश द्वार बंद करून कंपनीत ये जा करणारी वाहतूक अळविली आहे,मागणी मान्य होई पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील असे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
बाखर्डी – पालगाव चे सरपंच अरुण रागीट, ग्राम.पं.सदस्य सौ.माया मडावी,रवी कुंभारे,संतोषी माऊलिकर यांच्या समवेत शेकडो पालगाव वाशी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर शेकडो पुरुष व स्त्रिया ठिय्या मांडून बसल्याचे चित्र दिसून येत आहे…
मात्र सद्यस्थितीत असलेले कंपनी व्यवस्थापन हे कामगारांच्या बाबतीत व दत्तक गावाच्या विकासाच्या बाबतीत मागील कित्येक वर्षापासून उदासीन असण्याचे चित्र सर्वच दत्तक गावातील ग्रामस्थांना बघायला मिळत असून,राजकीय दबाव कंपनी प्रशासनावर राहिला नसल्याचे बोलले जात आहे.