Pandurang devotees were overwhelmed by the increase in Sri Kshetra Paduka Vitthal Darshan of Mata Mahakali Paduka Darshan was visited by many people
चंद्रपूर :- आषाढी एकादशीचे औचित्य साधून येथील माता महाकाली मंदिर ते श्री क्षेत्र वढा पर्यंत पायी वारीचे आयोजन सार्वजनिक स्वयंभु जागृत विठ्ठल रुख्मिणी मंदिर,वढा तर्फे मंगळवार 16 जुलैला करण्यात आले.या वारीचे मार्गदर्शन स्वामी चैतन्य महाराज यांनी केले.
श्री क्षेत्र वढा येथे 2018 मध्ये श्री विठ्ठलाची मूर्ती नदीपात्रात आढळून आली होती. त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर चंद्रपूर ते वढा वारीची प्रथा सुरू झाली. मंगळवारी (16 जुलै) सकाळी 6.30 ला माता महाकाली मंदिर येथील मुख्य आरती आटोपल्यावर माता महाकालीच्या पादुका व विठ्ठलाचे पूजन करून चैतन्य महाराज यांनी शंखनाद करीत वारीला सुरवात केली. सजविलेल्या रेंगीत (बैलबंडी) माता महाकालीच्या पादुका व विठ्ठल विराजमान झाले. Paduka Vitthal Darshan of Mata Mahakali
वारी वाजत गाजत विठ्ठल नामाचा जयघोष करीत गिरणार चौक, गांधी चौक, जटपुरा गेट व पडोली मार्गे वढा येथे सुमारे 25 किमी चे अंतर पार करीत सायंकाळी 6 च्या सुमारास पोहोचली. चैतन्य महाराजांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेकडो विठ्ठल भक्तांनी सहभाग घेतला.
संतांचा वारसा जपत आहेत स्वामी चैतन्य महाराज
अनेक वर्षांपासून पंढरपूरची वारी साक्षात अनुभवणाऱ्या संतांनी ‘माझे माहेर पंढरी’ असे म्हणत पंढरपूरशी नाते नाते जोडले. ‘अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरेन तिन्ही लोक’ असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संत तुकाराम महाराज देखील वारी करायचे. तुकाराम महाराज यांचे पुत्र नारायण महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून पंढरपूरला नेण्याची परंपरा सुरू केली.तशीच परंपरा येथे चैतन्य महाराज यांनी 2018 पासून सुरू केली असून येथील पालखीत माता महाकालीच्या पादुका ठेवल्या जातात. संतांचा वारसा जोपासण्याचे काम स्वामी चैतन्य महाराज करीत आहेत. Paduka Darshan was visited by many people
गिरणार चौकात भाजपाने केले स्वागत
माता महाकाली मंदिरापासून निघालेल्या वारीत स्वामी चैतन्य महाराज यांच्या सह शेकडो वारकरी पालखी घेऊन टाळ, मृदंगाच्या आवाजात भजन, भारुड, संकीर्तन गात डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन भगिनी मार्गस्थ झाले. सर्व वारकरी आनंदमय वातावरणात पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन फुगडी व रिंगणाचे सुंदर प्रदर्शन करीत पायी निघाले. वारीचे गिरनार चौकात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भाजपा तर्फे स्वामी चैतन्य महाराज व पालखीचे पुष्पवर्षाव करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी वारकऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
भाजपा नेते धनराज कोवे, रवी चाहारे, राकेश बोमंनवार, उमेश आष्टनकर, संतोष भोसकर, प्रभाकर गोहकार, बंडू पुरकर, शंकर वडारकर, महेंद्र वडस्कर, मारुती हागे, सविता मसे, आशा मोहिजे, सविता गोरकार, आणि किरण बांदुरकर, तनुश्री बांदुरकर, सुलभा साव, सुरेश वाडकर, विकास हागे, बाबा चेणे यांचे हस्ते वारकऱ्यांना अल्पोपहार वितरित करण्यात आला.