Thursday, February 22, 2024
Homeआमदारनिराधार महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न - आ....

निराधार महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न – आ. किशोर जोरगेवार

Our efforts to help destitute women benefit from various government schemes – MLA Kishore Jorgewar

◆ संकल्प संस्थेच्या वतीने मकर संक्राति निमित्त श्रीमतींचा सौभाग्य सोहळा कार्यक्रमाचे आयोजन

चंद्रपूर :- संकल्प संस्थेच्या वतीने नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबविल्या जात आहे. परितक्ता आणि निराधार महिलांसाठी आपण आयोजित केलेला श्रीमतींचा सौभाग्य सोहळा हा अभिनव उपक्रम असून यातून अशा महिलांना प्रोत्साहन मिळणार आहे. आपणही कर्तव्य सेतू केंद्र सुरु केले असून या केंद्राच्या माध्यमातून निराधार महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

संकल्प संस्थेच्या वतीने मकर संक्राति निमित्त मुल रोड येथील कार्यालयात श्रीमतींचा सौभाग्य सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार, आय.एम. ए तथा लायन्स क्लबच्या माजी अध्यक्षा डॉ. राजलक्ष्मी, उत्कृष्ट शास्त्रीय नृत्यांगना मृणालीनी खाडिलकर, संकल्प संस्थाच्या सचिव डॉ. सिमला गाजर्लावार, निमा फोरम च्या वसुधा लोढीया आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. On the occasion of Makar Sankranti organized by Sankalp Sanstha, Mrs. Saubhagya Sohala program

एकल पालकतत्व असुन देखील न खचता परिवाराचा उदरर्निवाह करत असलेल्या निराधार, परितक्ता महिलांसाठी आपण आयोजित केलेला हा कार्यक्रम त्यांच्यात नवी ऊर्जा तयार करणारा आहे. त्यांच्या पाठीशी आपण आहात हा आत्मविश्वास या कार्यक्रमातून आपल्या या भगीनी घेवून जाणार आहे. आपण या समाजाच्या घटक आहात. आपण स्वत: कष्ट करुन आपल्या परिवाराचे पालन पोषण करत सन्मानाने जगत आहात या पेक्षा मोठे समाधान असू शकत नाही असे यावेळी ते म्हणाले.

निराधार महिलांसाठी विविध शासकीय योजना कार्यान्वित आहे. त्या आपल्या पर्यंत पोहचल्या पाहिजे. अनेकदा योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून वाईट प्रकार घडल्याचा अनूभव या महिलांना येत असतो. अशा अनेक तक्रारीही आमच्याकडे आल्या होत्या. त्यानंतर आपण यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात कर्तव्य सेतू केंद्र सुरु केल. या केंद्राच्या माध्यमातून हजारो महिलांना निराधार योजनेचा लाभ आपण मिळवून दिला आहे. सोबतच विविध शासकीय योजनांची माहिती या केंद्राच्या माध्यमातून आपण देण्याचे काम करत असून योजनेसाठी लागणारे कागदपत्रही इथूनच उपलब्ध करुन देत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

संकल्पच्या वतीने आयोजित कार्यक्रम कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमात आपल्याला शिवणकला प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र दिल्या जाणार आहे. आपण येथे अवगत केलेली शिवणकामाची कला स्वत:पूरता मर्यादित न ठेवता यातून स्वतःचा व्यवसाय उभा करा. लोकप्रतिनीधी सोबतच आपला भाऊ म्हणून आपल्याला सहाकार्य करण्याची आमची भूमिका असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात निराधार महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular