Otherwise.. Agitation against Maharashtra Pollution Control Board Chandrapur ; president of Safed Zenda Workers Union, warned
चंद्रपूर :- सफेद झेंडा कामगार संघटनेचा माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांना दिनांक 29 जानेवारी रोजी निवेदन देण्यात आले. या निवेदनाचा माध्यमातून मागणी करण्यात आली कि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर दिनांक 6 नोव्हेंबर 2023, दिनांक 5 जानेवारी 2024, दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी निवेदन, स्मरणपत्र तसेच वारंवार विनंती करुण सुध्दा MPCB महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय चंद्रपूर यांनी लायडस मेटल घुग्घुस कंपनीवरती कसलीही, कोणतीही कारवाई केली नाही. किंवा त्या बाबत आम्हाला सुचवणार असे सांगुन सुध्दा अद्याप आम्हाला सुचविले नाही.
लायडस मेटल कंपनी हे प्रदुषणामध्ये लोह्याचे कण बाहेर सोडते अशा कंपनीवर सक्त कारवाई करण्यात यावी. या प्रदुषणामुळे घुग्घुस शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आहे या कंपनीवर लवकरात लवकर कारवाई करुन कंपनीला घुग्घुस शहराचा दहा किलोमीटर दुर बाहेर करण्यात यावे अशी मागणी केली असता. अद्याप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर अधिकार्यांनी कंपनीवर कारवाई केली नाही.
म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर अधिकार्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी नाईलाजाने आम्हाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर चा विरोधात तीव्र आंदोलन दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी करण्यात येत आहे.
या आंदोलनामध्ये जे काही नुकसान व भरपाई चे जिम्मेदार लायडस मेटल एनर्जी प्रा. लि. कंपनी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर शासन प्रशासन राहतील असा इशारा सफेद झेंडा कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या वतीने देण्यात आला आहे.