Organizing the 2nd International Film Festival in Chandrapur from 9th to 11th February ; Screening of various shows at Mirage Cinema
■ ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून सिनेरसिकांना मेजवानी !
चंद्रपूर :- आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय सिनेमा आणि या क्षेत्रात काम करणारी मंडळी दर्जेदार आणि गुणसंपन्न आहे; परंतु जगातील तसेच भारतातील उत्तम चित्रपट चंद्रपूरच्या रसिकांना बघता यावे यासाठी पुणे फिल्म फेस्टिवलच्या धर्तीवर चंद्रपूर फिल्म फेस्टिवल (सिफ) चे आयोजन मागील वर्षीपासून करण्यात आले आहे. येत्या 9 फेब्रुवारी पासून दुसरा तीन दिवसीय चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिराज सिनेमा येथे सुरू होत असून सिनेरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (सिफ ) उदघाट्न ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जेष्ठ दिग्दर्शक निर्माते श्री जब्बार पटेल उपस्थित राहणार आहेत.९ ते ११ फेब्रुवारी २०२४ दरम्यान मिराज सिनेमा येथे संपन्न होणाऱ्या या महोत्सवाच ची “सिनेमा इज़ होप” ही थीम आहे..या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. ‘ त्यानिमित्ताने नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, महानगरपालिकेचे आयुक्त श्री विपीन पालीवाल यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘वल्ली ’ (मराठी, दिग्दर्शक – मनोज शिंदे) हा उद्घाटनाचा चित्रपट (ओपनिंग फिल्म) दाखवण्यात येणार आहे.महोत्सवात एकूण देश विदेशातील १७ चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. हे सर्व चित्रपट इंग्लिश सबटायटल सहित प्रेक्षकांना पाण्याची संधी लाभणार आहे. मागील वर्षीच्या महोत्सवाला चंद्रपूरच्या चित्रपट प्रेमिकांनी दिलेली दाद म्हणूनच या वर्षी देखील उत्मोत्तम चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.
महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपट खालील प्रमाणे
1. वल्ली – दि . मनोज शिंदे
2. ह्युमनिसट व्यंपायर सिकिंग कन्सेंटिंग स्युसायडिकल पर्सन – दि . एरियन लॉइयस सीज़
3. द फॉक्स – दि . एड्रियन गॉइजिंगर
4. इरत्ता – दि . रोहित एम गी कृष्णन
5. गुड्बाइ ज्युलिया – दि . मोहम्मद कॉर्डोफनी
6. सिटी ऑफ विंड – दि . लखगवादुलम पुरेवोचिर
7. द साइरन – दि . सेपीडेह फारसी
8. लव इज़ फॉर ऑल – दि . जयप्रकाश राधाकृष्णन
9. द बर्डेनेड – दि. अमर गमाल
10. बिहाइंड द माउंटन्स – दि . मोहम्मद बिन अट्टाई
11. आर्ट कॉलेज १९९४ – दि . लुई जैन
12. भेरा – दि . श्रीकांत प्रभाकर
13. सिटिज़न सेंट – दि . तीनातीन काजरिशविली
14. द बुरीटी फ्लॉवर – दि . जाओ साळविज आणि रेणी नाडेर मेसोरा
15. डेज़र्ट – दि . फाऊदी बेनसैदी
16. बहादुर – दि . दिवा शाह
17. जिप्सी – दि . शशी चंद्रकांत खंदारे