Organizing a grand free diagnosis and treatment camp at Korpana; come A joint initiative of Mla Subhash Dhote Friends and Acharya Vinoba Bhave Rural Hospital Savangi (Meghe). चंद्रपूर :- रविवार दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक १० वाजता राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे मित्रपरिवार आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यामानाने वसंतराव नाईक महाविद्यालय कोरपना येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय सावंगी (मेघे) चे प्रत्येक विषयाचे तज्ञ डॉक्टर व त्यांची चमू हजर राहणार आहे, डॉक्टर त्यांचा स्टाफ मिळून सुमारे १०० स्पेशलिस्ट येणार आहेत त्याचप्रमाणे आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज दंत आजार, मुखाचे आजार तपासणारी सुसज्ज वाहन, स्तनांचे कर्करोग व इतर आजार तपासण्यासाठी मॅमोग्राफी वाहन सुद्धा उपलब्ध राहणार आहे. तसेच हृदयरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, श्वसन रोग तज्ञ, उच्च रक्तदाब, मधुमेह, मोतीबिंदू, काचबिंदू आजार, कान नाक घसा तज्ञ, डोळ्यांचे आजार, पोटाचे विकार तज्ञ, शस्त्रक्रिया, हर्निया, हायड्रोसिल आदींचे स्पेशलिस्ट डॉक्टर सुद्धा सदर शिबिराला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात येत आहे.
त्यामुळे जिवती व कोरपणा तालुक्यातील सर्व गरजू आजारी रुग्णांनी रविवार दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत नोंदणीसाठी वसंतराव नाईक महाविद्यालय कोरपना येथे आयोजन समितीकडे तसेच आयोजन समिती द्वारा दिलेल्या सदस्यांशी संपर्क साधून नोंदणी करून अधिकाधिक संख्येने क्षेत्रातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.