Sunday, December 8, 2024
Homeआमदारश्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने महाकाली मंदिर येथे महाआरती व भजनाचे...
spot_img
spot_img

श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने महाकाली मंदिर येथे महाआरती व भजनाचे आयोजन..

Organized Maha Aarti and Bhajan at Mahakali Temple on behalf of Shri Mahakali Mata Mahotsav Samiti

◆ महोत्सव समितीचे सचिव अजय जयसवाल यांनी केली सपत्निक आरती

चंद्रपूर :- श्री महाकाली माता महोत्सव समीतीच्या वतीने महाकाली मंदिर येथे महाआरती, भजन व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समीतीचे सचिव अजय जयसवाल यांना महाआरतीचा मान मिळाला. त्यांनी सपत्निक माता महाकालीची आरती केली.

यावेळी श्री माता महाकाली महोत्सव समीतीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष अॅड. विजय मोगरे, कोषाध्यक्ष पवन सराफ, विश्वस्त मिलिंद गंपावार, सुनिल महाकाले, राजेश शास्त्रकार,श्याम धोपटे, मधुसुदन रुंगठा, विलास मसराम, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, दुर्गा वैरागडे, युवा नेते अमोल शेंडे, कार्तिक बोरेवार, शंकर दंतुलवार, आशा देशमूख, अनिता झाडे, वैशाली मद्दीवार, रोडमल गहलोत, प्रा. श्याम हेडाऊ, वैशाली मेश्राम, अल्का मेश्राम, अस्मिता दोनारकर, अनिता झाडे, माधूरी बावणे यांच्यासह महोत्सव समितीच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली ची महती संपूर्ण राज्यभरात पोहचावी पर्यायाने येथील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने चंद्रपूर येथे श्री माता महाकाली महोत्सवाला सुरवात करण्यात आली आहे. यंदा सदर महोत्सवाच्या दुस-या वर्षीही माता महाकालीच्या भक्तांचा मोठा सहभाग लाभला. आता श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने वर्षभर विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला आहे. सदर नियोजनानुसार महिण्यातून एकदा माता महाकाली मंदिर येथे, महाआरती, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्याचे नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान मंगळवारी येथे महाआरती, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाबूपेठ येथील ज्ञान विकास भजन मंडळाच्या संचाने भजन सादर केले. त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी श्री महाकाली माता महोत्सव समीतीचे सचिव अजय जयसवाल यांनी सहपरिवार श्री माता महाकालीची आरती केली. यावेळी जयसवाल परिवारा तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शेकडो नागरिकांनी महाप्रसाद कार्यक्रमाचा लाभ घेतला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular