Organized Annual Sports and Cultural Festival at Kalyan College of Nursing
चंद्रपूर :– इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित कल्याण कॉलेज ऑफ नर्सिंग राजुरा येथे तीन दिवसीय वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे मोठ्या थाठामाठात आयोजन करण्यात आले.
या दरम्यान विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. सदर क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी बक्षीस वितरण तथा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.
यात विजयी स्पर्धकांना सन्मान चिन्ह तथा प्रत्येक सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी फॅशन शो, गीत, संगीत, नृत्य, नाटिका, विनोद अशा बहारदार कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

समारोपीय कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष, लोकप्रिय आमदार सुभाष धोटे, संस्थेचे संचालक अभिजित धोटे, कल्याण काॅलेज आँफ नर्सिंगचे प्राचार्य संतोष शिंदे, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.