Organization of Nari Shaktivandan Scooter Rally Program in Chandrapur City; 300 women participate in scooter rally
◆ भाजपा जिल्हा महानगर महिला मोर्चाचा स्तुत्य उपक्रम
चंद्रपूर :- विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नारी शक्तीवंदन स्कुटर रॅली कार्यक्रमाचे आयोजन भाजपा जिल्हा महानगर महिला मोर्चा तर्फे आयोजित करण्यात आले. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभाग घेतला. हा स्त्री सक्षमीकरणाकरीता देशभरात राबविण्यात येत आहे.
आज दिनांक ५ मार्च 2024 रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय तथा चंद्रपूर – वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व भाजप महानगराचे अध्यक्ष राहूल पावडे यांच्या नेतृत्वात भाजपा जिल्हा महानगर महिला मोर्चातर्फे ‘नारी शक्तीवंदन’ स्कुटर रॅली या कार्यक्रमाचे आयोजन महिला मोर्चा चंद्रपूर महानगर अध्यक्षा सविता कांबळे यांच्या नेतृत्वात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक इथुन सुरुवात करण्यात आली. मा.ना. सुधीर मुनगंटीवार आणि सर्व कार्यकर्त्या व पदाधिका-यांसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन या स्कुटर रॅलीला मा.ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्कुटर रॅलीला हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात करण्यात आली. महिलांनी घातलेला पोषाख व टोक्यावर बांदलेले फेटे हे या रॅलीचे विशेष आकर्षण राहीले. या कार्यक्रमाला महिला मोर्चा महामंत्री किरण बुटले, शिला चव्हाण, सुषमा नागोसे, कल्पना बगुलकर, उपाध्यक्षा शितल गुरनुले, माया उईके, चंद्रकला सोयाम, कविता सरकार, वंदना जांभुळकर, वनिता डूकरे, कल्पना गिरडकर, उषा मेश्राम, सपना नामपल्लीवार, मोनिषा महातव, रेणुका घोडेस्वार, पुष्पा शेंडे, सुवर्णा लोखंडे, कोनिका सरकार, संगीता बावणे, संगिता खांडेकर, आशा आबोजवार, प्रियंका चिताडे, सुनिता जयस्वाल, वंदना संतोषवार, भावना नागोसे, वर्षा सोमलकर, शितल आत्राम, वंदना राधारपवार, लिलावती रवीदास, रेखा चन्ने, संगीता बावणे, माया मांदाडे, सिंधु राजगुरे, भारतीय जनता पक्षाचे महामंत्री सुरज पेदुलवार, रामपाल सिंग, प्रज्वलंत कडू, भाजपाचे उपाध्यख रवी गुरनुले, भाजपा महानगर मंडळ अध्यक्ष, रवी लोणकर, सचिन कोतपल्लीवार, संदिप आगलावे, दिनकर सोमलकर, पुरुषोत्तम सहारे आदींनी सहकार्य केले.