One such honesty: Ten lakh rupees came into the account
चंद्रपूर :- गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा येथून निवृत्त झालेले कर्मचारी वर्गाकरिता त्यांच्या अकाउंट मध्ये रक्कम वटविण्याकरता प्रतिभा वाकडे, कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती वरोरा या तालुक्यातील अनेक निवृत्त कर्मचारी यांच्या खात्यात त्यांचे देणे असलेले रक्कम टाकत असतात ते अचानक महादेव दत्तूजी मैंदलवार रा. चिंचाळा, पोस्टे पडोली तालुका चंद्रपूर यांच्या खात्यात चुकीने 10 लाख 34 हजार 197 रुपये रक्कम टाकण्यात आले.
या गोष्टीला दोन महिने निघून गेले दोन महिन्या दरम्यान पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी वर्ग सार्वत्रिक निवडणूक 2024 कामी व्यस्त असल्याने व पुढचे व्यक्तीस मार्च अकाउंट दरम्यान टाकण्यात आलेले रक्कम निवृत्त कर्मचारी यांना अकाउंट मध्ये रक्कम न आल्याने चौकशी केली असता दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये रक्कम गेल्याची समजले.
त्यावरून चौकशी केली असता सदर रक्कम महादेव दत्तूजी मैदलकर यांच्या खात्यात जमा झाली असल्याचे कळाले, त्यावरून त्यांच्याशी संपर्क करून विचारले असता मैदलकर यांनी आपला प्रसमाणिकपणा दाखवीत हो माझ्या अकाउंट मध्ये पैसे आले त्यानुसार निखिल महादेव मैदलकर यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांचे नावे चेक सुपूर्द केला.
राजू आरवेलीवर व नितीन पेंढारकर पोलीस स्टेशन रामनगर यांच्या मदतीने ज्ञानेश्वर नारायण कुंभारे कनिष्ठ लेखा अधिकारी पंचायत समिती वरोरा व प्रियंका तीतरे कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती वरोरा यांच्या समक्ष त्यांना दिनांक 2 मे 2024 रोजी त्यांना ज्या अकाउंट मधून रक्कम आले त्या अकाउंट च्या नावे चेक देऊन परत करण्यात आले.