Tuesday, November 12, 2024
HomeBussinessसीटीपीएस चे 4600 कंत्राटी कामगार करणार कामबंद आंदोलन
spot_img
spot_img

सीटीपीएस चे 4600 कंत्राटी कामगार करणार कामबंद आंदोलन

One-day strike by 4600 contract workers of CTPS for various demands
CTPS Contract Labor Union Joint Action Committee information in letter conference

चंद्रपुर :- चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत निर्मिती CSTPS कंत्राटी कामगार संघटना संयक्त कृती समिती मधील सहभागी एकूण 17 कंत्राटी कामगार संघटननेने कंत्राटी कामगारांच्या विवीध समस्यांच्या मागण्यांबाबत सीटीपीएस चे मुख्य अभीयंता यांचेशी पत्रव्यवहार केला, परंतु महाजनको प्रशासनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे कृति समितितील 17 कंत्राटी कामगार संघटनेने 16 जुलै ला मेजर गेट प्रवेशद्वार दुर्गापुर समोर कामबंद आंदोलन करणार असल्याची माहीती समिति चे अध्यक्ष सदानंद देवगडे यांनी चंद्रपुर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रपरीषदेत दीली. One day work stoppage movement

चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र चंद्रपुर येथील कंत्राटी कामगारांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे नक्षलभत्ता मिळण्याबाबत, सीटीपीएस च्या कंत्राटी कामगारांच्या प्रवेशपत्र (Gate Pass) मध्ये नव्याने करण्यात आलेले बदल तसेच यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक तात्काळ रद्द करून कंत्राटी कामगारांचे पूर्वीप्रमाणे प्रवेशपत्र (गेटपास) बनविण्याबाबत, सीटीपीएस च्या कंत्राटी कामगारांचे चारित्र्य सत्यापन प्रमाणपत्र (पोलिस व्हेरीफिकेशन) Police Verification ची मुदत 2 वर्षांकरिता लागू करून कंत्राटी कामगारांचे प्रवेशपत्र (गेटपास) मुदत कंत्राटाच्या मुदतीप्रमाणे 1 वर्ष किंवा 2 वर्षाची करण्याबाबत, सीटीपीएस च्या ज्या कंत्राटी कामगारांच्या बायोमॅट्रीक Biometric मध्ये नोंद झालेली नाही त्यांची परत नोंद प्रक्रिया सुरु करून नोंद करण्याबाबत तसेच कंत्राटी कामगारांच्या समस्या घेऊन संघटनेचे पदाधिकारी मुख्य अभियंता यांच्या कार्यालयात प्रशासकीय इमारत येथे कोणत्याही अटी न ठेवता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मीटिंगकरिता परवानगी मिळण्याबाबत पत्रव्यवहार केला.

परंतु महाजेनको प्रशासनाने कृती समिती शिष्टमंडळा सोबत कोणत्याही प्रकारची बैठक न लावता या मागण्यासंदर्भात 4 जुर्ल 2024 ला उपमुख्य अभियंता यांनी मागण्याविषयी नकारात्मक स्पष्टीकरण चे पत्र समिति चे अध्यक्ष सदानंद देवगडे यांच्याकडे पाठविले.

महाजेनको प्रशासनाची कामगारांच्या मागण्या संदर्भात नकारात्मक भूमिकेमुळे नाईलाजास्तव सीएसटीपीएस कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 16 जुलै रोजी मेजर गेट दुर्गापुर समोर एक दिवसीय कामबंद आंदोलन करणार आहे. भविष्यात आवश्यकता पडल्यास बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा सीएसटीपीएस कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती ने पत्रपरीषद मधे दिला आहे.

महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ, रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार इत्यादी प्रमुख दोन मागण्यांसह इतर सर्व 17 मागण्याची पूर्तता करण्याबाबत परिपत्रक देऊन सहा टप्प्यामध्ये आंदोलन करून सुध्दा प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे 11 जुलै 2024 ला मुंबई येथे आझाद मैदानावर प्रशासनाच्या विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. आंदेालनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृती समिती मार्फत करण्यात येत आहे.

पत्रपरीषदेला सीएसटीपीएस कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिति चे अध्यक्ष सदानंद देवगडे, कार्याध्यक्ष शंकर बागेश्वर, उपाध्यक्ष प्रमोद कोलारकर, संघपाल धोटे, निताई घोष, हेरमन जोसेफ, सचिव युवराज मैंद, सहसचिव प्रफुल सागोरे, संघटक संतोष ढोक, कोषाध्यक्ष मंगेश चौधरी, सहसंघटक नितीन वाढई, बामन बुटले, वामन मानकर, अशोक गिलबिले उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular