Friday, March 21, 2025
HomePoliticalशिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पसंख्याक कार्यकारीणीचे रुग्णांना फळ वाटप

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पसंख्याक कार्यकारीणीचे रुग्णांना फळ वाटप

On the occasion of Shivsena MP Dr. Shrikant Shinde’s birthday, fruits were distributed to the patients on behalf of the minority executive

चंद्रपूर :- बाळासाहेबांची शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना अल्पसंख्याक कार्यकारिणीच्या वतीने चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळं वाटप करण्यात आले.

 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख जमील शेख यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 

चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना सेफ, केळी, संत्री, अंगुर असे फळ वाटप करण्यात आले, रुग्णांनी शिवसैनिकांचे आभार मानले.

यावेळी चंद्रपूर शिवसेना अल्पसंख्याक कार्यकारिणीचे जिल्हा प्रमुख जमील शेख, चंद्रपूर तालूका प्रमुख संतोष पारखी, अल्पसंख्याक विभागाचे चंद्रपूर महानगर प्रमुख ओबेद रुस्तम खान, उप महानगर प्रमुख सोहेल शेख, चंद्रपूर तालूका प्रमुख सुरजित सिंग बावरे, दुर्गापूर शाखा प्रमुख करन साखरे, भिवापूर शाखा प्रमुख साहिल शेख, मोहम्मद शरीफ शेख, मोहम्मद हसन कुरेशी, उमेद खान, साहिल खान, सद्दाम अन्सारी, फरहान खान, शाहरुख शेख, इलियास शेख, हर्षद बिरीया, मोहम्मद इरफान शेख व आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular