Friday, February 7, 2025
Homeआमदारप्रजासत्ताक दिन राष्ट्राला आकार देणारी मूल्ये आणि आदर्शाचा उत्सव - आ. किशोर...

प्रजासत्ताक दिन राष्ट्राला आकार देणारी मूल्ये आणि आदर्शाचा उत्सव – आ. किशोर जोरगेवार : प्रजासत्ताक दिना निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण, विविध कार्यक्रमांचे आयोजन

On the occasion of Republic Day flag hoisting by MLA Kishore Jorgewar, organization of various programs

चंद्रपूर:- प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असून प्रत्येक भारतीयांना या सणाचा अभिमान आहे. आपण आपल्या अधिकाराबरोबरच कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. प्रजासत्ताक दिनी संविधानातून नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व बहाल झाले असून प्रजासत्ताक दिन राष्ट्राला आकार देणारी मूल्ये आणि आदर्शाचा उत्सव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

प्रजासत्ताक दिना निमित्त आयोजित विविध कार्यक्रम करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मदरसा येथे ध्वजारोहन करण्यात आले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या अपल्संख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशिद हुसेन, मदरसा कमेटीचे अध्यक्ष मुस्ताक खाँन, सचिव अलताफ अली, उपाध्यक्ष इरफान बाबा, उपसचिव हसन सिध्दीकी, फैजान बाबा, अब्दुल सहिद अब्दुल वाहिद, शेख सिराद शेख मिसार, आदींची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, आपली राज्यघटना केवळ कायदेशीर कागदपत्र नाही हा एक सामाजिक करार आहे जो आपल्याला एक वैविध्यपूर्ण आणि एकसंध राष्ट्र म्हणून एकत्र बांधतो. आम्हाला आमची मते व्यक्त करण्याचा अधिकार देतो. आजच्या या दिवशी आपण आपल्या राष्ट्राच्या वाढीसाठी आणि समृद्धीसाठी सकारात्मक योगदान देणारे जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्प करु, हा प्रजासत्ताक दिन आपल्या भूतकाळाचा अभिमान, आपल्या वर्तमानातील जबाबदारी आणि आपल्या भविष्याची आशा या भावनेने साजरा केला पाहिजे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

यावेळी मदरसा येथे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी तिरंग्याला सलामी दिली. त्यानंतर राष्ट्रगीत झाले या कार्यक्रमाला मदरसा कमिटीच्या सदस्यांची व नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी मिठाई वाटप करण्यात आली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular