Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeLoksabha Electionशेवटच्या दिवशी.. एवढे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात ? : 70 टक्के मतदान

शेवटच्या दिवशी.. एवढे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात ? : 70 टक्के मतदान

On the last day.. so many candidates in Chandrapur LokSabha arena;
Strive for 70 percent turnout

चंद्रपूर :- 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याकरिता वेळ होता. परंतु, एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज मागे न घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात 15 उमेदवार कायम आहेत. Loksabha Election 2024

चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा मतदार संघाकरिता 20 ते 27 मार्च या कालावधीत ईच्छूक उमेदवारांकडून 48 नामनिर्देशनपत्रे दाखल झाले होते, Chandrapur – Vani – Arni Lok Sabha Constituency या नामनिर्देशनपत्रांची 28 मार्च रोजी छाणनी झाल्यानंतर 33 नामनिर्देशनपत्र अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे पात्र 15 उमेदवारांपैकी 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज मागे न घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात 15 उमेदवार कायम आहेत यात

चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्राकरिता निवडणूक लढविणाच्या उमेदवारांमध्ये आता इंडियन नॅशनल काँग्रेसच्या प्रतिभा सुरेश धानोरकर, भारतीय जनता पार्टीतर्फे सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार, बहुजन समाज पक्षाचे राजेंद्र हरिश्चंद्र रामटेके, जनसेवा गोंडवाना पार्टीकडून अवचित श्यामराव सयाम, जय विदर्भ पार्टीचे अशोक राणाजी राठोड, गोंडवाना गणतंत्र पार्टीतर्फे नामदेव मानिकराव शेडमाके, बहुजन रिपब्लीकन सोशालिस्ट पार्टीच्या पुर्णिमा दिलीप घोनमोडे, वंचित बहुजन आघाडीकडून राजेश वारलुजी बेले, अखिल भारतीय मानवता पक्षातर्फे वनिता जितेंद्र राऊत, सन्मान राजकीय पक्षाचे विकास उत्तम लसंते, भीम सेनेतर्फे विद्यासागर कालीदास कासर्लावार, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) तर्फे सेवकदास कवडू बरके आणि इंडिया (डेमोक्रेटीक) तर्फे सेवकदास कवडू बरके आणि अपक्ष उमेदवारीमध्ये दिवाकर हरीजी उराडे, मिलींद प्रल्हाद दहिवले, संजय निलकंठ गावंडे यांचा समावेश आहे.

अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी 30 मार्च रोजी सायंकाळी दिली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघात एकूण 18 लाख 37 हजार 906 मतदार नोंदवले गेले आहेत. मतदान केंद्रांची संख्या 2 हजार 118 एवढी आहे. यंदाच्या निवडणुकीचे विशेष असलेल्या 85 पेक्षा जास्त वयोगटातील मतदारांकडून प्रात्त अर्ज 12 डी ची एकूण संख्या 1 हजार 76 एवढी असून, अशाच दीव्यांग मतदारांच्या अर्ज 12 डि ची संख्या 163 एवढी आहे.

अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आजपर्यंत 65 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे परंतु यंदाच्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणात अद्ययावत बदल केला आहे. अनावश्यक नावे गाळण्यात आली आहे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागू नये, तेथे उत्तम व्यवस्था केल्या जाव्या यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. मतदार संघात कमी मतदान झाले तेथे जास्त प्रयत्न केले जाणार आहे. त्यामुळे यंदा कमीत कमी 70 टक्क्यांपर्यंत मतदार होईल असा प्रयत्न असेल असा विश्वास जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular