Thursday, November 30, 2023
Homeमहाराष्ट्र राज्यओबीसींनी शस्त्र तयार ठेवावी - सचिन राजूरकर

ओबीसींनी शस्त्र तयार ठेवावी – सचिन राजूरकर

OBCs should keep arms ready – Sachin Rajurkar, General Secretary, National OBC Federation                                                          चंद्रपूर :- रवींद्र टोंगे , विजय बलकी, व प्रेमानंद जोगी यांनी २१ दिवस अन्नत्याग आंदोलन करून ओबीसी समाजाचे आरक्षण वाचविले आहे परंतु संकट काही टळले नाही आहे , मनोज जरांगे वारंवार ओबीसी समाजातून आरक्षण मागणी करत आहे, आरक्षण वाचविण्यासाठी परत आंदोलनाची तयारी ठेवावी, सरकारने कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसीत मोडणाऱ्या कुणबी, तेली , माळी, नाव्ही, सुतार , लोहार, धनगर, इत्यादी जातींनी आप आपली पारंपरिक शस्त्र तयार ठेवावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे अध्यक्षस्थानावरून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर बोलत होते.

राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी संघटना, सर्व जातीय संघटना यांच्यावतीने ओबीसी योद्धा विजय बलकी यांच्या येरूर गावात ओबीसी जनजागृती भेटीगाठी अभियान 10 नोव्हेंबरला सायंकाळी येरूर या गावात घेण्यात आले. अभियानाचे उद्‌घाटन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष दिनेश चोखारे यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाला ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे, , विजय बलकी ,प्रेमानंद जोगी यांचा सत्कार गावकऱ्यांनी केला, प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच्या सौ मनीषा मडावी, उपसरपंच्या सौ सुनीता वडस्कर डॉ. संजय घाटे, रणजित डवरे, गणेश आवारी, हितेश लोडे, विनोद बीटे ,रामकांत बलकी, माजी सरपंच मनोज आमटे, ग्राम पंचायत सदस्य रमेश बुचे, नामदेव बोरकुटे, देवराव कुमरे , सविता घागरगुंडे, मृणाली बरडे, रुपल देशकर,गीताबाई कडस्कर, अरुण देऊलकर, भाऊराव झाडे, देवराव सोनपित्तरे,उपस्थिती होती.

ओबीसींच्या मागण्या उजागर करताना दिनेश चोखारे म्हणाले, निम्मे सत्र संपूनही ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी वसतिगृह सुरू झालेले नाहीत. वसतिगृह नाही तर किमान आधार योजना लागू करून ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा देणे आवश्यक होते. सरकार प्रत्येक गोष्टीत दिरंगाईचे धोरण अवलंबत आहे. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जातनिहाय सर्व्हे करणे आवश्यक आहे. यातून ओबीसींना आणि सरकारलाही नेमक्या परिस्थतीची जाणीव होईल, असे मतही त्यांनी मांडले.

प्रणय मशाखेत्री व आकाश कडुकर यांनी आपल्या संविधानिक हक्कासाठी जागरूक राहून आरक्षण वाचविणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे मत मांडले.
विजय बलकी यांनी प्रास्ताविकातून अभियानाची रुपरेषा मांडली. संचालन प्रतीक्षा जोगी, भाग्यश्री वैद्य तर आभार तुळशीराम देरकर यांनी मानले.

अभियानाला येरूर येथील विलास गौरकार, ,भारत निखाडे,सुरज मोरे,भास्कर घागरगुंडे, अतुल बोबडे, हर्षल जोगी,कृनाल जोगी, कुणाल पोतराजे, प्रीतम,बोनसुले, हनुमान भोयर, निखिल दुरडकर, दीपक सोनटक्के, सौ जयमाला भोयर , विद्या लेडागे, सौ सुनीता विरुतकर, गिरीजा बरडे, श्यामकला बरडे, सुनंदा वैद्य, मंदा भुसारी, किरण वैद्य आदींनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular