Friday, January 17, 2025
HomeAssembly Electionआज सात उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

आज सात उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल

Nomination papers of seven candidates filed in Chandrapur district
121 applications received from aspirants in six assembly constituencies

चंद्रपूर :- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नामांकन दाखल करावयाच्या तिस-या दिवशी आज (दि. 24) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण सात उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. Assembly Election 2024

यात 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात सुभाष रामचंद्र धोटे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) Subhash Dhote आणि वामनराव सदाशिव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), Wamanrao Chatap 71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सुरेश मल्लारी पाईकराव (अपक्ष), Suresh Paikrao 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात निरंक, 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात विजय नामदेवराव वडेट्टीवार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), Vijay Wadettiwar 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात किर्तीकुमार भांगडीया (भारतीय जनता पार्टी) Kirtikumar Bhangdiya आणि सतिश वारजुकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), Satish Warjurkar 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रवीण सुरेश काकडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) यांनी गुरुवारी नामांकन अर्ज दाखल केले.

तर आज 70-राजुरा विधानसभा मतदारसंघात 19 अर्ज, 71-चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 14 अर्ज, 72-बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 14 अर्ज, 73-ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 34 अर्ज, 74-चिमूर मतदारसंघात 20 अर्ज आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघात 20 अर्ज असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून 121 अर्जांची उचल करण्यात आली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular