Thursday, April 24, 2025
HomeMaharashtraअविनाश पाल यांना उमेदवारी द्या : भाजपा प्रवासी प्रभारी यांना कार्यकर्त्यांचे निवेदन

अविनाश पाल यांना उमेदवारी द्या : भाजपा प्रवासी प्रभारी यांना कार्यकर्त्यांचे निवेदन

Nominate Avinash Pal for Bramhapuri Assembly:                                       Chandrapur BJP Travel In-Charge Faggansinh Kulaste met by workers

चंद्रपूर :- 73 ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राकारिता भारतीय जनता पार्टीकडून BJP Bramhapuri Assembly जनमतातील उमेदवार अविनाश पाल यांना उमेदवारी मिळावी म्हणून विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी यांनी चंद्रपूर भाजपा प्रवासी प्रभारी फग्गनसिंह कुलस्ते यांची भेट घेऊन निवेदन दिले.

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात यावेळेस बदल करायचा असल्यास अविनाश पाल यांना उमेदवारी देण्यात यावी व उमेदवारी मिळाल्यास त्यांना जिंकून आणाची जबाबदारी आम्ही प्रमुख पदाधिकारी घेऊ असे त्यांच्या भेटीदरम्यान सांगितले

भारतीय जनता पार्टीचा कट्टर कार्यकर्ता असून दोन पंचवार्षिक पंचायत समिती सदस्य, भाजपा तालुका अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक म्हणून त्यांनी चांगले काम केले असून सर्वाना न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असून आजपर्यंत सावली तालुक्यात उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे यावेळेस भारतीय जनता पार्टीने सावली तालुक्यातील अविनाश पाल यांना उमेदवारी देण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी त्यांना सोपविले.

निवेदन देताना दौलत भोपये, सदाशिव बोबाटे, नितीन टेप्पलवार, डियेज आभारे, मुक्तेश्वर थोराक, प्रविण देशमुख, प्रविण मेश्राम, ज्ञानेश्वर निकोडे, रोशन अन्सारी, देवानंद पाल, शरद मडावी, रामदास गेडाम, वर्षा गेडाम, गौरव यम्पलवार, अरविंद निकेसर आदी कार्यकर्ते उपस्थित होते

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular