Thursday, November 30, 2023
Homeआमदारउपजिल्हा रुग्णालयालगतच दांडिया चा दणदणाट ; दादाच्या दांडियामुळे रुग्णांना त्रास ; ...

उपजिल्हा रुग्णालयालगतच दांडिया चा दणदणाट ; दादाच्या दांडियामुळे रुग्णांना त्रास ; आमदार सुभाष धोटे यांची आरोग्यमंत्राकडे तक्रार

noise of Dandiya near the Upazila Hospital ; Patients suffer due to Devrav Dada’s Dandia ;  Complaint of MLA Subhash Dhote to Health Ministry                                                              चंद्रपूर :- नवरात्रीचा उत्सव धामधूमित सुरू झालेला आहे. राजुऱ्यात जिल्हा परिषद हायस्कूल येथे दादाचा दांडिया प्रथमच सुरू झाल्यामुळे रात्रोला आवाजाचा दणदणाट असतो. काही फूट अंतरावरच उपजिल्हा रुग्णालय परिसर लागून आहे. यात लहान मुलापासून, गरोदर माता, अनेक वयस्कर रुग्ण आजारामुळे भरती आहेत. अशा स्थितीत दांडियाच्या कर्कश आणि अती तीव्र आवाजामुळे रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे आमदार सुभाष धोटे यांनी संवेदनशील ठिकाणी देण्यात आलेल्या दांडिया परवानगी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले असून अतिशय संवेदनशील क्षेत्रात असलेल्या या दांडियाची परवानगी रद्द करण्याची मागणी आरोग्यमंत्र्याकडे केलेली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णांना त्रास झाल्यास नागरिकांनीही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.

जागरूक नागरीक राजुरा जि. चंद्रपूर यांचे प्राप्त निवेदनानुसार राजुरा येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कुल व ज्युनियर कॉलेज राजुरा येथे 100 वर्षाची परंपरा मोडीत काढत शासकीय परिसरात धमाल दांडीया कार्यक्रम घेतलेला आहे. मुख्याध्यापक उईके यांना शासकीय जागा कार्यक्रमाचा देण्याचा कोणताही अधिकार नसतांना स्वतःची खाजगी मालकी समजुन शाळा व्यवस्थापन समिती किंवा राजुरा शहरातील कोणत्याही गणमान्य व्यक्तीशी चर्चा न करता मुख्याध्यपकाने परस्पर दांडीया कार्यक्रमासाठी शाळा परिसराची जागा देण्यात आली असल्याचे निवेदनात नमुद आहे. noise of Dandiya near the Upazila Hospital ; Patients suffer due to Devrav Dada’s Dandia ;  Complaint of MLA Subhash Dhote to Health Ministry

सदर शाळेच्या बाजुला 100 खाटांचे उपजिल्हा रूग्णालय असुन परिसरातील दुर्धर आजाराचे रुग्ण, लहान बालके, गरोदर माता इत्यादी 100 ते 150 रूग्ण 24 तास नियमीत भरती आहेत. डी.जे.च्या 100 (dB) डेसीबल च्या वरून सुरू असलेल्या कर्कश आवाजामुळे उपजिल्हा रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे जेव्हा की, रहिवास वापर व रूग्णालय परिसरात रात्रीच्या वेळेस 40 ते 45 (dB) डेसीबल आवाजाची मर्यादा असतांना नियमांचे उलंघन करून शासकीय कार्यालयाचे परिसरात कार्यक्रम सुरू असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. त्यामुळे नियमाचे उलंघन करून परवानगी देणारे संबधिंत मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांचेवर तातडीने कार्यवाही करून सेवेतून निलंबीत करण्याबाबतची मागणी शालेय शिक्षण विभागाचे सचिव यांच्याकडे केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular