Union Minister Nitin Gadkari’s public meeting for the campaign of MLA Kishore Jorgewar
चंद्रपूर :- महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर जोरगेवार Kishor Jorgewar यांच्या प्रचारार्थ केंद्रीय परिवहन मंत्री व भाजप नेते नितीन गडकरी Nitin Gadkari हे उद्या, बुधवारी चंद्रपूरात असणार असून, दुपारी दीड वाजता घुग्घुस येथील बसस्थानकाजवळील लॉयड मेटल परिसरात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. Nitin Gadkari’s public meeting for the campaign of MLA Jorgewar
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ भाजपचे स्टार प्रचारक चंद्रपूरात येत असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्या नंतर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची उद्या बुधवारी घुग्घुस येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
घुग्घुस येथील बसस्थानका जवळील लॉयड मेटल परिसरात सदर सभा पार पडणार असून, ग्रामीण भागासह घुग्घुस परिसरातील नागरिकांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.