Thursday, February 22, 2024
Homeअपघातथ्रेशर मशीनच्या अपघातात नितेशचा मृत्यू ; सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांची पीडित...

थ्रेशर मशीनच्या अपघातात नितेशचा मृत्यू ; सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांची पीडित परिवाराला आर्थिक मदत

Nitesh dies in thresher machine accident;  Social activist Rajesh Belle’s financial assistance to the victim’s family

चंद्रपूर :- पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथे धान मळणी करीत असतांना अचानक थ्रेशर मशीनमध्ये दोन्ही पाय व कमरेखालचा भाग ओढल्या गेल्याने नितेश पिपरे या मजूराचा रविवारला मृत्यू झाला. आर्थिक स्थिती बेताची व कर्ता पुरुषाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दुर्दैवी मृत्यू पावलेल्या नितेश पिपरे (वय ३४) यांच्या कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत आर्थिक मदत करुन कुटुंबाचे सांत्वन केले.

नितेश पिपरे हा गरिब कुटुंबातील पण कर्तबगार मुलगा होता. तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. वृद्ध आई-वडील, पत्नी व दोन चिमुकल्या मुली असा सुखी संसार सुरू होता. मात्र रविवारला मृतक नितेश हा मजुरीसाठी थ्रेशर मशीनवर गेला आणि दुर्दैवाने त्याचा जीव गेला. घरची आर्थिक स्थिती बेताची.

नितेशच्या पश्चात पत्नी,दोन चिमुकल्या मुली व वृद्ध आई- वडील असा परिवार आहे.कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगरच कोसळला. आर्थिक कोंडी सुरू झाली. अशावेळी चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी मृतक नितेशच्या कुटुंबीयांना सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आर्थिक मदत केली व कुटुंबाचे सांत्वन केले.

यावेळी मृतकाची पत्नी सुषमा पिपरे,वडिल बाबुराव पिपरे, सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले,माजी उपसभापती ज्योती बुरांडे,सामाजिक कार्यकर्ते शैलेश जुमडे,सोनल धोपटे, कालिदास गव्हारे उपस्थित होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular