Nephew usurped uncle’s land; Allegation of Neelkanal Bhoyer in press conference चंद्रपूर : बाहेरगावी राहत असल्याचा आणि अज्ञानाचा फायदा घेत पुतण्याने खोटा मुखत्यारनामा बनवून मोक्यावरची जमीन हडपल्याचा आरोप करीत नीळकंळ भोयर यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
नीळकंठ कवडू भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची वडगाव येथे वडिलोपर्जित ३ एकर जमीन आहे. सातबारावर गजानन भोयर, नीळकंळ भोयर, मनोहर भोयर आणि बहिणींची नावे आहेत. नीळकंळ भोयर आणि मनोहर भोयर हे मागील अनेक वर्षांपासून बाहेरगावी राहत होते. हीच संधी साधून गजानन भोयर यांचा मुलगा स्वप्निल भोयर याने परस्पर नीळकंठ भोयर आणि मनोहर भोयर यांची नावे सातबारावरून कमी केली. खोटे मुखत्यारनामा तयार करून काही जमीन प्लाट पाडून विक्री केली.
उर्वरित जमीनही विक्रीला काढली असल्याची माहिती मिळताच नीळकंठ भोयर आणि मनोहर भोयर यांच्या पत्नी निशा भोयर यांनी चंद्रपूर गाठून विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडे तक्रार करून न्याय मागितला. परंतु, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. या जागेवर सुरू असलेले बांधकाम थांबविण्यासंदर्भात मनपाला पत्र दिले. मनपाने बेदखल केल्याचा आरोप नीळक भोयर, निशा मनोहर भोयर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. Nephew usurped uncle’s land; Allegation of Neelkanal Bhoyer in press conference
खोटे मुखत्यारनामा तयार करून जमिनीची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या स्वप्निल भोयर याच्यावर कारवाईची मागणी नीळकंळ भोयर, निशा मनोहर भोयर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.