Saturday, April 20, 2024
HomePoliticalधर्मांध आणि संविधानविरोधी लोकांपासून देशाला वाचविण्याची गरज- प्रा. जावेद पाशा

धर्मांध आणि संविधानविरोधी लोकांपासून देशाला वाचविण्याची गरज- प्रा. जावेद पाशा

need to save the country from bigots and anti-constitutional people – Prof. Javed Pasha

◆ धर्मांध शक्तीला पराभूत करण्यासाठी नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन…
चंद्रपूर :- देशात सध्या धर्मांध आणि संविधानविरोधी सरकार आहे. या सरकारपासून संविधानाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस संविधान बदलण्याचे विधान या धर्मांध पक्षाच्याच लोकांकडून केले जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत या धर्मांध शक्तीला पराभूत करणे आवश्यक असून, सर्व पुरोगमाी विचारसरणीच्या नागरिकांनी एकत्र येत संविधानविरोधी सरकारला सत्तेतून बाहेर घालविण्यासाठी इंडिया आघाडीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन NCP राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. जावेद पाशा यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

२०१४ नंतर राजकीय संरक्षणात मोठ्या प्रमाणात धार्मिक व सांस्कृतिक हल्ले करण्यातआले आहे. दर्गा, मशिदी, चर्च, मदरसे या अल्प संख्याकाच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक अस्तित्वावर संविधानविरोधी शक्तीचे हल्ले होत आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी अल्पसंख्याक आणि बहुजन समाजाने शरद पवार यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीमागे नागरिकांनी उभे राहावे असे आवाहन पाशा यांनी केले.

यावेळी भारतीय मुस्लिम परिषदेचे राज्य प्रभारी प्रा. डॉ. असलम बारी, फुले-शाहू-आंबेडकरी विचार मंचच्या राज्याध्यक्ष डॉ. ममता मून, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष बाबू इसा शेख, अब्दूल जमील शेख, सूरज चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular