NCP protests against the decision of the Central Election Commission at Chandrapur
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँगेस Ncp शरदचंद्र पवार Sharad Pawar पक्षाच्या वतीने देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या समर्थनार्थ पक्षपातपणे निर्णय देणाऱ्या Central Election Commission केंद्रीय निडणुक आयोगाच्या व आदरणीय शरद पवारसाहेबांसोबत गद्दारी करुण फुटलेल्या गटाच्या विरोधात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शहर जिल्हाध्यक्ष दिपक जयस्वाल, महीला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, शहरकार्याध्यक्ष सुधारक कातकर, महीला शहराध्यक्ष शिल्पा कांबळे, युवक शहराध्यक्ष कलाकार मल्लारप यांच्या नेतृत्वात” देश का नेता कैसा हो, पवार साहब जैसा हो” “चिन्ह तुम्हारा बाप हमारा,”लोकशाहीची हत्या करणाऱ्या हुकूमशाही ईडी सरकारचा निषेध असो” “पक्षपात पने निर्णय देणाऱ्या केंद्रीय निवणुक आयोगाचा निषेध असो” अश्या घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीने देशावर त्यांचा एकछत्री अंमल राहावा या सूडबुद्धीने देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांना उध्वस्त करण्याचे धोरण अवलंबले आहे. दुर्दैवाने पक्षातील असंतुष्ट असलेले गद्दार याला बळी पडले व आदरणीय पवार साहेबांनी अथक परिश्रमातून उभा केलेला 25 वर्षाचा पक्ष त्यांनी एका रात्रीत फोडून भाजपच्या झोळीत टाकला.
भारतीय जनता पार्टीच्या पिंजरातील पोपट असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने पवार साहेबांच्या पक्षाचे नाव व चिन्ह या गद्दार फुटीर गटाला देऊन अन्याय केला आहे, याची साक्षीदार महाराष्ट्रातील सर्व जनता आहे. या हुकूमशाहीचा, दडपशाहीचा निषेध व्यक्त करत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज तीव्र विरोध केला. Political
यावेळी आंदोलनात ज्येष्ठ नेते प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे, युवक शहराध्यक्ष कलाकार माल्लारप, माजी. जि .प सदस्य वंदना आवळे, माजी नगरसेवक विनोद लभाने, जिल्हा उपाध्यक्ष राहुल पावडे, अब्दुल जमिल शेख, बाबूभाई इसा, मारोती झाडे, परड गिरडकर, नंदू चवरे, जिल्हा सचिव नंदा सेरकी, जिल्हा संघटक, जिल्हा सचिव सरस्वती गावंडे, शोभा घरडे, जिल्हा सरचिटणीस लता जांभूळकर, रेशमा मेश्राम, सुशिला नैताम, हंसा मोहुरले, अर्चना घोटकर, कांता गाऊत्रे, शालिनी वैद्य, संजवणी तुंभेकर, प्रकाश शोभा नर्वाते, सुनीता मडावी, सूर्यवंशी, मंगला भोयर, प्रकाश नळे महीला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.