Ncp Leader Eknath Khadse suffered a heart attack राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांना रविवारी दुपारी हृयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली आहे. एकनाथ खडसेंची Eknath Khadse मुलगी रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांना फोन करून ही माहिती दिली.
त्यानंतर शिंदे यांनी तातडीने हवाई रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. एकनाथ खडसेंना हवाई रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी जळगावहून मुंबईला नेण्यात आले. Ncp Leader Eknath Khadse suffered a heart attack
एकनाथ खडसेंना अचानक छातीमध्ये दुखू लागले होते. त्यानंतर त्यांना जळगावच्या गजानन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर एकनाथ खडसेंना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे कळले.
त्यामुळे खडसेंना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी घेतला. त्यासाठी खडसेंच्या मुलीनी शिंदे यांना फोन केल्यानंतर त्यांनी हवाई रुग्णवाहिकेची व्यवस्था केली.