Friday, February 7, 2025
HomeEducationalराष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षक रत्न पुरस्कार सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांना जाहीर

राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षक रत्न पुरस्कार सिनेट सदस्य गुरुदास कामडी यांना जाहीर

National level Bharat Shiksha Ratna Award to Senator Gurudas Kamadi
Announced by Real Indo Global Vision Social Development Gurukul Foundation Dhule

चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट फाऊंडेशन धुळे Real Indo Global Vision Social Development Foundation Dhule यांच्या कडून दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक व क्रीडा क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावरील भारत शिक्षक रत्न India Teacher Gem Award पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा जी.बी. मुरारका कला व वाणिज्य महाविद्यालय शेगाव येथे दिनांक 28 जुलै 2024 रोजी वितरित करण्यात येत आहे. National level Bharat Shiksha Ratna Award to Senator Gurudas Kamadi

राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. मनोहर पाटील, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद पवार प्रशाकीय अधिकारी डॉ. प्रविण गिरसे, डॉ. संभाजी पाटील, राष्ट्रीय सल्लागार डॉ. संजय गोरे यांनी या वर्षीचा भारत शिक्षकरत्न पुरस्कार गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद तथा अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांना जाहीर केला आहे. >> ईरई धरणाचे दरवाजे उघड, सतर्क

गुरुदास कामडी हे सन्मित्र सैनिकी विद्यालय चंद्रपूर येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वीही गुरुदास कामडी यांना उत्कृष्ट शिक्षक 2009, महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक , दैनिक लोकशाही आदर्श शिक्षक 2012, बेस्ट टिचर अवार्ड 2017 अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Announced by Real Indo Global Vision Social Development Gurukul Foundation धुळे >> चंद्रपूर मनपा ‘स्पार्क पुरस्कारा’ ने सन्मानित

गुरदास कामडी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळील सुरवात केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, भारतीय जनता यवा मोर्चा, विदर्भ भटके-विमुक्त एकता संघटना च्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक प्रबोधन कार्यक्रमातून विविध कार्य केले आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व्यवस्थापन परिषद, अधिसभा सदस्य म्हणून विद्यापीठात महाविद्यालयीन शिक्षण व विद्यार्थ्यांचें प्रश्न मांडले आहेत. विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्र, पंडित दिनदयाल उपाध्याय एकात्म मानववाद अध्यासन, शारीरिक शिक्षण क्रीडा मंडळ सदस्य, संविधान सन्मान समरोह समिती सदस्य अशा विविध समितीवर कार्यरत आहेत. >> मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमात शुल्क माफी द्या

गुरुदास कामडी यांना उच्च शिक्षण व माध्यमिक शिक्षण यावर केलेले कार्य व भटके – विमुक्त समाज प्रबोधन व विद्यापीठा क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल रिअल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फांऊंडेशन धुळे यांच्या कडून भारत शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular