Thursday, February 22, 2024
HomePoliticalनागपूर फत्ते आता अमरावतीचा गड सर करूया - आमदार आमदार अडबाले :...

नागपूर फत्ते आता अमरावतीचा गड सर करूया – आमदार आमदार अडबाले : विमाशि संघाचे प्रांतीय अधिवेशन प्रारंभ

Nagpur Fatte now let’s go to the fort of Amravati;  MLA MLA Adbale: Provincial convention of Vimashi Sangh begins

चंद्रपूर :- विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून शिक्षकांची विविध प्रश्ने सोडविण्यात आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठीही संघाचा लढा सुरू आहे. संघटन वाढीसाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागपूर विभागात आता आपला विजय झाला. पुढील निवडणुकीत अमरावतीचा गड काबिज करण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, असे प्रतिपादन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या ‘प्रांतीय अधिवेशन २०२४’ शनिवारपासून सुरुवात झाली. शकुंतला फार्मस्‌ (लिली) येथे अधिवेशनाचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. चार फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात शिक्षकांच्‍या ज्‍वलंत समस्‍यांवर चर्चा करण्यात येणार आहे. अधिवेशनाच्या अध्यक्षस्‍थानी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्रावण बरडे होते. उद्‌घाटन माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे यांनी केले. याप्रसंगी ज्‍येष्ठ साहित्‍यीक आचार्य ना.गो. थुटे, जगदीश जुनगरी यांची उपस्थिती होती.

माजी आमदार व्ही. यू. डायगव्हाणे म्हणाले की, नागपूर विभागात आपला झालेला विजय हा आपल्या संघटनशक्तीचा आहे. भविष्यात आपले संघटन आणखी कसे मजबूत करता येईल या दृष्टीने आतापासून प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी संघटनेतील तरुणांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

याप्रसंगी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्रावण बरडे, ज्येष्ठ साहित्यिक ना. गो. थुटे, जगदिश जुनघरी यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. मान्यवरांच्या भाषणानंतर नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सक्रिय पाठिंबा देणाऱ्या ३५ विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्‍कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. दोन दिवस चालणाऱ्या या प्रांतीय अधिवेशनाला विदर्भातील शिक्षकांची मोठी उपस्थिती आहे. या कार्यक्रमाचे संचालन सतीश मेश्राम, बळवंत विखार यांनी तर आभार प्रांतीय उपाध्यक्ष अरविंद देशमुख यांनी मानले.

आज स्मरणिकेचे प्रकाशन
रविवारी (ता. ४) सकाळी १० वाजता उद्‌घाटन सोहळा तथा “संघर्ष २०२४” स्‍मरणिकेचे प्रकाशन होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी माजी आमदार व्‍ही. यू. डायगव्हाणे राहतील. उद्‌घाटन आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले, आमदार धीरज लिंगाडे, प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे, विमाशि संघ अध्यक्ष श्रावण बरडे, स्‍वागताध्यक्ष राज पुगलिया यांची मंचावर उपस्‍थिती राहील. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील विविध समस्‍यांवर चर्चा करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular