Mumbai – Ballarshah Superfast Express, which has been removed from special status, welcome today in the presence of Hansraj Ahir and citizens.
चंद्रपूर :- लोकमान्य टिळक टर्मिनस् ते बल्लारशाह या साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेनचा विशेष दर्जा (Special) हटविण्यात आल्यानंतर चंद्रपूर-बल्लारशाह येथे दि. १३ मार्च २०२४ रोजी पोहचणाऱ्या या गाडीचे स्वागत मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा कार्यकर्ते व रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.
एलटीटी – बल्लारशाह सुपरफास्ट एक्सप्रेसला LTT Ballarshah Superfast Express (नं. ०११२७/०११२८) यापुर्वी स्पेशल दर्जा असल्याने या ट्रेनचे भाडे प्रवास्यांना परवडणारे नव्हते स्पेशल दर्जा असल्याने ही ट्रेन नेहमीच उशिरा धावायची प्रवास्यांच्या अडचणीची दखल घेत हंसराज अहीर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री, वरीष्ठ अधिकारी यांचेशी पत्रव्यवहार, चर्चा करून स्पेशल दर्जा हटविण्यात यश मिळविले. त्यामुळे या गाडीचे भाडे ३० टक्के कमी होणार असून ती वेळेवर चालणार आहे.
आता एलटीटी-बल्लारशाह ट्रेन (नं. २२१०९/२२११०) ही साप्ताहीक गाडी एलटीटी स्थानकावरून रात्री ०९.४५ वा. निघून दि. १३ मार्चला चंद्रपूर स्थानकावर स. १०.५६ वा. तर बल्लारपूर येथे दु. १२.०० वा. पोहचेल. बल्लारशाहून दु. ०१.४० ला मुंबईकरीता प्रस्थान करेल चंद्रपूर स्थानकावर दु. ०१.५७ पोहचणार आहे. दोन्ही स्थानकावरून हिरवी झेंडी दाखवून ही गाडी मुंबईकरीता रवाना केली जाईल.
सदर गाडीला त्रीसप्ताहिक करण्याचे हंसराज अहीर यांचे प्रयत्न सुरू असून त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.