Thursday, November 30, 2023
Homeअपघातसुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे महावितरणचे आवाहन

सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे महावितरणचे आवाहन

Msedcl’s appeal to celebrate a safe Diwali

चंद्रपूर :- दिवाळीची लगबग सुरु झाली असून सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण आहे, ह्या दिवाळीचा आनंद अधिक व्दिगुणित करण्यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले असून, महावितरणने आपल्या समस्त वीज ग्राहकांना, कर्मचा-यंना आणि हितचिंतकांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Msedcl’s appeal to celebrate a safe Diwali

दिवाळीत होत असलेली सजावट, रोषणाई आणि आतिषबाजी यामुळे दुर्दैवी घटना व्हायला एक कारणही पुरेसे आहे, अश्या घटनांनी आनंदाचे वातावरण दु:खात बदलायला वेळ लागत नसल्याने अश्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठि खबरदारी घ्यावी, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवाळीच्या दिवशी फ़टाक्याने लागलेल्या आग़ीच्या घटना दरवर्षीच हजारोच्या संख्येने होत असतात, यात केवळ आर्थीकच नव्हे तर जिवीत हानीही मोठ्या प्रमाणात होत असते. सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने, निष्काळजीपणा आणि उदासिनता यामुळे अश्या घटना होत असतात. आपल्या व आपल्या कुटुंबियांचा दिवाळीचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी महावितरणने काही खबरदारीचे उपाय सुचविले आहेत.

दिवाळी आणि दिवे यांचे एक अतूट नाते आहे, त्यामुळे दिव्यांनी घराची सजावट करतांना ती मोकळ्या जागेतच लावावीत. पडदे, बिछाना यापासून ते लांब असतील याची काळजी घ्यावी. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दुर आणि उंचीवर तसेच पंखे, वीजतारा यापासूनही ते दुर ठेवावेत. उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा, तुटलेल्या वीज तारा वापरु नये किंवा जोड देतांना योग्य दर्जाच्या इन्सुलेशन टेपने त्या सुरक्षित करुन घ्यावेत, तुटलेले सॉकेट्स वापरू नये, घरात कुणीही नसतांना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत. असे आवाहन करतांना महावितरणने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Msedcl’s appeal to celebrate a safe Diwali

काही महत्वाचे

1. फ़टाके उडवितांना मोकळ्या जागेतच उडवावि.

2. विज तारांच्याजवळ फ़टाके उडवू नये.

3. विजेच्या उपकरणांजवळ फ़टाके ठेवू नये.

4. विद्युत सॉकेट्सवर अधिक भार टाकू नये.

5. रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्याव्यात.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular