Tuesday, March 25, 2025
HomeLoksabha Electionखासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा, कारण...

खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा, कारण…

MP Pratibha Dhanorkar’s resignation, what is the reason?

विधानसभेच्या अनुभवाचा फायदा लोकसभेतून जनतेच्या विकास कामांसाठी करणार खासदार प्रतिभा धानोरकर 

चंद्रपूर :- वरोरा-भद्रावती विधानसभेच्या माध्यमातून जनतेने आमदार म्हणून निवडून दिले. २०१९ ते २०२४ या कालावधीत विधानसभेच्या माध्यमातून जनसामान्यांची संपूर्ण कामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले.  यावेळी विधानसभेच्या अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द करुन विधानसभा सचिवालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

अलिकडेच लोकसभा निवडणूक पार पडून त्यामध्ये चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार पदांची धुरा प्रतिभा धानोरकर यांच्याकडे आली.  खासदार पदी निवडून आल्याने आज विधानसभा अध्यक्षांकडे आमदार पदाचा राजीनामा सुपूर्द केला.  यावेळी अध्यक्षांनी प्रतिभा धानोरकर यांना भावी राजकीय आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांनी विधानसभेत केलेल्या कार्याबद्दल स्तुतीसुमने उधळली. याप्रसंगी प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत वेळोवेळी जनतेच्या प्रश्नांवर चर्चेसाठी संधी दिल्याबद्दल अध्यक्षांचे आभार मानले.  तसेच विधानसभा सचिवालयातील सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले व जनतेने ठेवलेल्या विश्वासाबद्दल कायमची ऋणी राहीन व विधानसभेत विविध आयुधांद्वारे जनतेच्या प्रश्नांवर केलेल्या चर्चेच्या अनुभवनातून लोकसभेत नव्या दमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे मत याप्रसंगी खा. प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.

दिवंगत खासदार बाळू धानोरकर व मला विधानसभेचा कालावधी पूर्ण करता आला नाही, पण जनतेच्या आशिर्वादाने आम्हाला खासदार म्हणून जनतेने दिलेली संधी माझ्या आयुष्यासाठी प्रेरणादायी ठरलेली आहे.  या निवडणूकीत जनतेने भरभरुन दिलेले आशिर्वाद मी विकास कार्यात परावर्तित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मतदेखील यावेळी व्यक्त केले. भविष्यात देखील जनतेच्या कामांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून  जनतेचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular