MP Pratibha Dhanorkar’s demand finally succeeded
The Maharashtra government has extended the deadline for the Ladki Bahin Yojana till August 31
चंद्रपूर :- महाराष्ट्र सरकार ने पावसाळी अधिवेशनात मुख्यंमत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. परंतु सदर योजनेचा कालावधी 1 जुलै ते 15 जुलै असल्याने त्या कालावधीत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता शक्य नसल्याने सदर योजने करीता अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी Chief Minister मुख्यंमत्री व उपमुख्यमंत्री Deputy Chief minister यांच्या कडे केली होती. त्यांच्या मागणी ला यश आले असून अर्ज भरण्याच्या कालावधीत वाढ करुन सदर कालावधी 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे. Extended the deadline for the Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने ची घोषणा केल्या नंतर सदर योजनेचा कालावधी कमी असल्याने व आवश्यक कागदपत्रांसाठी वेळ पुरेसा नसल्याने सदर योजनेच्या कालावधीत वाढ करण्याची मागणी शासनाकडे केली होती. या मागणीला यश प्राप्त झाले असून सदर योजनेच्या अर्ज भरण्याच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. Beloved Sister Scheme
अर्ज भरण्याची कालमर्यादा 31 ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे. त्या सोबतच रहिवासी प्रमाणपत्र व उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या अटी मध्ये देखील बदल करुन पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागु राहणार नाही. त्यासोबतच पाच एकर शेती अट देखील वगळण्यात आली आहे. योजनेच्या पात्रता वयोमर्यादेच्या निकषात 60 एवजी 65 वर्ष असा बदल करण्यात आला आहे.
तसेच रहिवाशी दाखल्या एवजी 15 वर्ष जुने रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, मतदार ओळख पत्र असा बदल करण्यात आला आहे.
सदर मागणी मान्य झाल्याने खासदार धानोरकर यांनी शासनाचे आभार मानले आहे व या योजनेकरीता महीलांसाठी लवकरच तालुका स्तरावर सेवा केंद्र सुरु करण्याची खासदार धानोरकर यांनी आश्वासीत केली आहे.