Monday, March 17, 2025
HomeEducationalखासदार प्रतिभा धानोरकर यांचे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण

खासदार प्रतिभा धानोरकर यांचे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण

MP Pratibha Dhanorkar’s 80 percent social cause and 20 percent politics: Full tuition fees paid by the student

चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- खासदार प्रतिभा धानोरकर नेहमी सामाजिक कार्यासाठी चर्चेत असतात. अशाच एका विद्यार्थ्याच्या पालकांनी मोबाईल वरुन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या संपर्क साधला. वडील नसलेल्या या विद्यार्थ्याच्या आईचे वॉट्सअॅप Whatsapp वरील निवेदन बघून खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar भारवून गेल्या व लगेच त्यांनी त्या मुलाचे संपूर्ण शुल्क भरुन शिक्षणासाठी मदतीचा हात दिला. Full tuition fees paid by the student

अलीकडे अनेक राजकारणी स्वतः चा स्वार्थ बघत असतांना स्वतः च्या लोकसभा क्षेत्राबाहेरील उस्मानाबाद येथील एका विद्यार्थ्याच्या आईचे निवेदन वॉट्सअॅप प्राप्त झाले. त्यांनी सदर निवेदनात खासदार धानोरकरांना भावनीक साद घालत विद्यार्थ्याच्या वडिलाचे निधन झाले असून मुलगा सैनिकी शाळा बल्लारपूर Military School येथे 10 वी शिकत असल्याचे सांगितले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने चालू वर्षाचे शैक्षणिक शुल्क भरु शकत नसल्याचे खंत व्यक्त केली. शैक्षणिक शुल्क न भरल्यास वर्ष वाया जाण्याची भिती व्यक्त केली.

सदर निवेदनाची दखल घेत सामाजिक भान राखत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सैनिकी शाळेच्या प्राचार्यांशी संपर्क करुन संपूर्ण शुल्क स्वतः भरणार असल्याचे सांगितले व आज  दि. 18 जुलै रोजी आपल्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून शाळेची संपुर्ण शुल्क कुठलेही राजकीय स्वार्थ न ठेवता लोकसभा क्षेत्रा बाहेरच्या एका आईची भावनिक हाक म्हणून भरले.

या घटनेने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी 80 टक्के समाजकारण Socialism व 20 टक्के राजकारण Politics ही व्याख्या सार्थ ठरविली. MP Pratibha Dhanorkar’s 80 percent social cause and 20 percent politics

उस्मानाबाद येथील त्या विद्यार्थ्याच्या आईने खासदार प्रतिभा धानोरकर यांचे आभार व्यक्त करीत लवकरच चंद्रपूर येथे येऊन भेट घेणार असल्याचे सांगितले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular