Felicitation Ceremony for newly elected MP Pratibha Dhanorkar will be organized tomorrow at Rajura
चंद्रपूर :- चंद्रपूर- १३ लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोषात गौरव करण्याच्या हेतूने दि. 12 जून 2024 रोज बुधवारला सायंकाळी 7 वाजता गांधी चौक, राजुरा येथे श्रीमती धानोरकर यांचा भव्य सत्कार सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे MLA Subhash Dhote यांच्या श्रीराम मंदिर राजुरा जवळील जनसंपर्क कार्यालया समोरून सायंकाळी 6 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
यानिमित्ताने होणाऱ्या भव्य मिरवणूक आणि सत्कार सोहळ्याला काँग्रेस आणि इंडिया तथा महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन च्या वतीने करण्यात येत आहे.