Sunday, December 8, 2024
HomeLoksabha Electionखा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार आणि महात्मा गांधी पुतळा अनावरण सोहळ्याचे आयोजन.
spot_img
spot_img

खा. प्रतिभा धानोरकरांचा सत्कार आणि महात्मा गांधी पुतळा अनावरण सोहळ्याचे आयोजन.

MP Pratibha Dhanorkar felicitated and Mahatma Gandhi statue unveiled at Rajura.

चंद्रपूर :- चंद्रपूर- 13 लोकसभा मतदार संघाच्या Chandrapur Loksabha Constituency नवनिर्वाचित खासदार श्रीमती प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोषात गौरव करण्याच्या हेतूने दि. 10 जून 2024 रोज सोमवार ला सायंकाळी 7 वाजता गांधी चौक, राजुरा येथे श्रीमती धानोरकर यांचा भव्य सत्कार करण्यात येणार असून

यावेळी राजुरा तालुका काँग्रेस कार्यालय गांधी भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी Mahatma Gandhi यांच्या पुतळ्याचे खा. प्रतिभा धानोरकर आणि आ. सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात येणार आहे.

यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे MLA Subhash Dhote यांच्या श्रीराम मंदिर राजुरा जवळील जनसंपर्क कार्यालया समोरून सायंकाळी 6 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

यानिमित्ताने होणाऱ्या भव्य मिरवणूक आणि सोहळ्याला काँग्रेस आणि इंडिया तथा महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन च्या वतीने करण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular