MP Dhanorkar met Defense Minister Rajnath Singh
Discussion on various topics, Minister’s positive reply
चंद्रपूर :- आज पासून लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील रक्षा विभागाच्या विविध समस्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज दिल्ली येथे MP Pratibha Dhanorkar खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रक्षा मंत्री राजनाथ सिंह Defence Minister Rajnath Singh यांच्या समवेत भेट घेऊन समस्या निकाली काढण्याची विनंती केली. यावेळी मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत समस्या लवकरच निकाली काढणार असल्याचे मान्य केले. MP Dhanorkar met Defense Minister Rajnath Singh
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे असलेल्या आयुध निर्माणीतील 22 अनुकंपा धारकांना तात्काळ सेवेत सामावून घ्यावे तसेच आयुध निर्माणीतील अनुकंपा धारकांचा प्रश्न त्वरित निकाली काढावा. त्यासोबच बल्लारपूर रोड वरील सैनिकी शाळेत चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना 10 टक्के जागा राखीव ठेवण्यासंदर्भात आज दिल्ली येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वरील विषयासंदर्भात निवेदन देऊन वरील समस्यांसंदर्भात त्वरीत निर्णय घेण्याची विनंती केली.
रक्षा मंत्री यांनी वरील विषयासंदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन सदर विषय लवकरच निकाली काढणार असल्याचे सांगितले.