‘Modi ji give us justice’
Workers’ letter to Prime Minister Modi Ji in blood
स्थानिक कामगारांचे सी. एम.पी. एल. कपानीच्या विरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरू
चंद्रपूर :- सी.एम.पी.एल. माती उत्खनन कंपनी विरोधात स्थानिक कामगारांचे 10 जून पासून तहसील कार्यालय राजुरा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी चक्क देशाचे तिसरी वेळा झालेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहीत “मोदीजी आम्हाला न्याय द्या” अशी मागणी केली आहे.
सी.एम.पी.एल. माती उत्खनन या कंपनीतील कार्यरत स्थानिक कामगारांना कंपनीचे काम संपल्याचे सर्व कामगारांना पत्र पाठवून कामावरून डावलण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला आहे. कारण सदर कंपनीचे दुसरे काम हे राजुरा विधानसभा क्षेत्र सास्ती इथे सुरु आहे.
कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्यास त्यांच्यावर तसेच त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ येणार.स्थानिक कामगारांना कामावरून न काढता सास्ती येथे स्थलांतर करण्यात यावे.
याकरिता अनैशा वाहन चालक कामगार संघटना चे संस्थापक अध्यक्ष सुरज भाऊ उपरे तसेच सामजिक कार्यकर्ते भूषणभाऊ फुसे यांच्या नेतृत्वात राजुरा तहसील कार्यालयासमोर दिनांक 10 जून 2024 रोज सोमवार ला बहुजनांच्या महापुरुषांना अभिवादन करून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आले. Local workers Indefinite dharna movement started against the CMPL company
बेमुदत धरणे आंदोलनात आंदोलनकर्ते आकाश ताकसांडे, ऋषी चौधरी, अजय इग्रपवार, साई कुमार मोगलीवार, राकेश चेनमेंवार, श्रीकांत जलावार, पांडुरंग मंगाम, आशिष पझारे,या वेळेस माणिक संजीव, दशरथ कोंडावार,मिथुन कांबळे,राहुल राठोड,विशाल सल्लम,संकेत भादिकर,शंकर काळे,प्रवीण जेल्लेल,प्रवीण चेनवेंनवार,उपस्थित होते.
आंदोलनाचा दुसरा दिवस
आज दिनांक 11 जून 2024 रोजी कामगारांच्या न्याय हक्कासाठी व शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यानी स्वतःच्या रक्ताने देशाचे पंतप्रधान मा. मोदीजींना पत्र लिहिले आहे. पत्राचा मचकुर “मां. मोदीजी आम्हाला न्याय द्या” असा आहे. ‘Modi ji give us justice’, Workers’ letter to Prime Minister Narendra ModiJi in blood
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी ही शासन आणी स्थानिक प्रशासनाने दखल घेतली नाही.