Tuesday, November 5, 2024
HomeAgricultureवारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवा :
spot_img
spot_img

वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवा :

Maintain regular power supply in case of frequent interruptions.                              MLA Subhash Dhote’s advice to the electricity department to provide relief to the public by taking immediate measures

चंद्रपूर :- आशिया खंडातील दुसऱ्या कंमाकावर असलेल्या चंद्रपुर जिल्हयामधुन महाराष्ट्रातील व इतरही राज्यामध्ये विज पुरवठा केला जातो. राज्यामध्ये विज पुरवठा हा चंद्रपुर जिल्हयातुन पुरविला जात आहे. चंद्रपुर जिल्हयामध्ये सर्वात मोठे विज निर्मीती केंद्र असून सूध्दा चंद्रपुर जिल्हयातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती या तालुक्यात वारंवार विद्युत खंडीत होत असल्याने नागरीकांच्या विद्युतीकरणाच्या वस्तुमध्ये बिघाड येत आहे.

उन्हाळा असल्याने नागरीकांना विजे अभावी ४५ ते ५० डिग्री शेल्सियस मध्ये राहावे लागत असुन लहान मुले, वयोवृध्द व इतरांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये विज वितरण विभागाचे कार्यप्रणाली विषयी नाराजी पसरलेली आहे.

करीता राजुरा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यात वारंवार खंडीत होणारा विद्युत पुरवठा नियमित सुरू ठेवणेसाठी तात्काळ उपाय योजना करण्यात याव्यात आणि तप्त उन्हाच्या दिवसात जनतेला अखंडितपणे विज पुरवठा करून दिलासा द्या अशा सूचना आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांनी अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ बाबुपेठ, चंद्रपुर यांना निवेदनाद्वारे केल्या आहेत.

अन्यथा आपले विभागाविरूध्द राजुरा शहरातील नागरीकांसह तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular