MLA Subhash Dhote will file his nomination form on October 28th
चंद्रपूर :- राजुरा विधानसभा मतदार संघाचे विकासपुरुष, जनसामान्यांचे नेते, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे सोमवार दिनांक २८ ऑक्टोबरला आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. आतापर्यंत दोनदा विधानसभा गाठलेले आणि जनसामान्यांचे प्रश्न सातत्याने विधानसभेत मांडून ते तडीस लावण्यासाठी संघर्ष करणारे सुभाषभाऊ धोटे MLA Subhash Dhote यावेळी तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजयासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षाच्या तथा काँग्रेसच्या सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी, चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे.
सोमवार दिनांक २८ ऑक्टोबरला निवडणूक निर्णय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयात आ. सुभाषभाऊ धोटे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी राजुराचे आराध्य दैवत भवानी माता मंदिर येथे दर्शन व आशिर्वाद घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर शेवटी सम्राट सेलिब्रेशन हॉल राजुरा येथे आ. सुभाष धोटे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. Political News
यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तथा सर्व घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारसंघातील नागरिकांनी भवानी माता मंदिर राजुरा येथे सकाळी ठिक १० वाजता हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेस तथा महाविकास आघाडी च्या सर्व घटक पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.