MLA Subhash Dhote took a class of officials of the construction department: instructed to complete partial constructions by May 30
चंद्रपूर :- राजुरा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या राजुरा- माथरा – गोवरी – पोवनी या राज्य मार्गावरील रामपूर जवळील रस्त्यालगत शिल्लक राहिलेले काम, तसेच गोवरी गावाजवळ असलेल्या फुलाचे व रस्त्याचे अर्धवट बांधकाम येथे MLA Subhash Dhote आमदार सुभाष धोटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांना घेऊन प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि येथेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा क्लास घेत स्थानिक नागरिकांच्या अडचणी, व्यथांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. खात्यात आले दहा लाख,… असाही प्रामाणिकपणा

राजुरा – माथरा – गोवरी- पवनी या राज्य मार्गाचे काम मागील तीन-चार वर्षापासून सुरू असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहे परंतु अनेक ठिकाणी अर्धवट असलेल्या रस्त्यांचे, पुलांचे बांधकाम नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. रामपूर जवळ तुरळक काम शिल्लक असून गोवरी नाल्यावरील पूल्याचे कामे अर्धवट असल्याने नागरिकांची मोठी दमछाक होत आहे. पावसाळ्यापूर्वी येथे काम पूर्ण होणे गरजेचे असून या संदर्भात नागरिकांनी वारंवार तक्रारी, आंदोलने करूनही संबंधित विभाग कामे पूर्ण करीत नसल्याने नागरिकांत प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे आमदार सुभाष धोटे यांनी आज अर्धवट असलेल्या रस्ते, पुलाची पाहणी केली आणि गोवरी येथे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ३० मे २०२४ पर्यंत अर्धवट कामे पूर्ण करण्याचे तसेच मुख्य मार्गावरील ओव्हर हेड विद्युत तारांची उंची वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. चारचाकी वाहनासह 5 लाखांचा सुगंधीत तंबाखू जप्त
या प्रसंगी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आकाश बाजारे, पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीचे अभियंता अभिशेख सरकार, विद्युत विभागाचे उप कार्यकारी अभियंता बडगु, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, विठ्ठल पाचभाई, शिवराम लांडे, गजानन उरकुडे, अशोक पिंपळकर, मधुकर सोयाम, विकास पिंपळकर, श्रीहरी परसुटकर, सचिन पाचभाई, रामदास पाचभाई, आकाश नांदेकर, चेतन बोभाटे, विठ्ठल गोरघाटे, हरिश्चंद्र जूनघरी, नीलकंठ पोथले, पुरुषोत्तम पाचभाई, पापा शेख, प्रकाश काळे, प्रभाकर जुनघरी यासह स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.