Saturday, April 20, 2024
Homeआमदारआमदार सुभाष धोटेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ; नगर परिषद राजुरा...

आमदार सुभाष धोटेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन ; नगर परिषद राजुरा च्या वतीने जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन.

MLA Subhash Dhote saluted Chhatrapati Shivaji Maharaj
Organized birthday celebrations on behalf of Rajura City Council

चंद्रपूर :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त राजुरा नगर परिषदेच्या वतीने आयोजित जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक राजुरा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्नाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून महाराजांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी न प राजुरा च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर, राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगरध्यक्ष सुनील देशपांडे, उपविभागीय अधिकारी रवींद्र माने, तहसीलदार ओमप्रकाश गौड, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड, पोलीस निरीक्षक योगेश पारधी, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, माजी नगरसेवक रमेश नळे, हरजित सिंग संधु, गजानन भटारकर, आनंद दासरी, केशवराव ठाकरे, रामचंद्र शेंडे, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, उमेश गोरे, सय्यद साबिर, नगर परिषद कर्मचारी, महिला बचत गटाच्या महिला यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular