MLA Subhash Dhote consoled the family of Rajesh Zade, a farmer who committed suicide
चंद्रपूर :- गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथील शेतकरी राजेश विश्वनाथ झाडे वय 47 वर्ष यांनी सततची नापिकी, कर्ज आणि वैयक्तिक अडचणी यामुळे नैराश्य येऊन विष प्राषण करून आत्महत्या केली. Farmers Suicide त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, २ मुली, १ मुलगा आणि परिवारजण आहेत. कुटुंबातील करता व्यक्ती आत्महत्या करून मरण पावल्याने त्या कुटुंबावर फार मोठे संकट उभे राहिले. >> सर्राइत दुचाकी चोराला LCB ने केली अटक
या घटनेची माहिती मिळताच क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि सांत्वन केले. आ. सुभाष धोटे यांनी दहा हजार रुपयाची आर्थिक मदत केली. तसेच तहसीलदार आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणी लक्ष देऊन मृतक कुटुंबीयांना शासकीय मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे निर्देश दिलेत. >> 25 लाखांचे अनधिकृत बियाणे जप्त

या प्रसंगी तहसीलदार शुभम बहाकार, कृषी अधिकारी पानसरे, कृ. उ. बा. स. संचालक अशोक रेशनकर, सरपंच अर्पणा रेचनकर, उपसरपंच जीवन अलोने, ग्रा. प. सदस्य कुसुम अलोने, पोलीस पाटील तुळशीराम काळे, भाग्यश्री मुद्द्यमवार, शंकर सोनटक्के, सिंधुताई अलोने, पंकज खर्डीवार, राकेश मुंजनकर, वसंत चिताडे, राजेश्वर पिपरे यासह स्थानिक नगरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.