MLA Subhash Dhote appointed as observer in Pune Lok Sabha Constituency
चंद्रपूर :- अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे Indian National Congress Party महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलाजी यांच्या सुचनेनुसार व काँग्रेसचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून लोकसभा निवडणूक २०२४ च्या ३४ पुणे लोकसभा मतदारसंघासाठी २१५ कसबा पेठ विधानसभा निरीक्षक म्हणून चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे MLA Subhash Dhote यांची नियुक्त करण्यात आली आहे.>> ओबीसिंच्या अधिकारासाठी राष्ट्रीय महाअधिवेशनात सामील व्हा..
लवकरच आ. सुभाष धोटे संबंधित विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून जिल्हाध्यक्ष, विधानसभा क्षेत्रातील प्रदेश पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी व महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी यांची बैठक घेऊन इंडिया आघाडीचे उमेदवार श्री. रविंद्र धंगेकर निवडणुकीत विजयी करण्यासाठी येथे आवश्यक नियोजन व प्रचार करणार आहेत.
आमदार सुभाष धोटे हे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार म्हणून उत्तम कामगिरी बजावित आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून येण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली असून यंदाच्या निवडणुकीत पून्हा एकदा चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे.>> चारचाकी वाहनासह 5 लाखांचा सुगंधीत तंबाखू जप्त
युवा अवस्थेपासून ते काँग्रेस पक्षात उल्लेखनीय कामगिरी करीत आले आहेत. त्यांच्या विविध क्षेत्रातील प्रदिर्घ अनुभव आणि पक्षनिष्ठा लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघात कसबा पेठ विधानसभा निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.