Sunday, December 8, 2024
Homeआमदारआमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले रेकॉर्डब्रेक विकासकामांचे भुमीपूजन व लोकार्पण : १०...
spot_img
spot_img

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले रेकॉर्डब्रेक विकासकामांचे भुमीपूजन व लोकार्पण : १० दिवस झंझावाती दौरा; शेकडो कामाचे भूमिपूजन

MLA Pratibhatai Dhanorkar performed record-breaking ground breaking and inauguration of development works: 10-day Zanjawati Tour;  Bhoomipujan of hundreds of works

चंद्रपूर :- वरोरा व भद्रावती तालुक्यातील विविध विकास कामांचे भुमीपूजन व लोकार्पण सोहळा आमदार प्रतिभाताई बाळुभाऊ धानोरकर यांच्या हस्ते पार पडला. या दौऱ्यात त्यांनी मागील १० दिवस झंझावाती दौरा केला व शेकडो कामांचे भूमिपूजन केले. या काळात त्यांनी विविध विकास कामांचे भुमीपूजन व लोकार्पण केले. यामध्ये स्मशानभूमी, रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सार्वजनिक सुविधा, आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा इत्यादींचा समावेश आहे. या दौऱ्यात त्यांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन विकास कामांची पाहणी केली आणि लोकांशी संवाद साधला. या विकास कामांमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

याप्रसंगी वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, वरोरा बाजार समिती माजी सभापती विशाल बदखल, जिल्हा मध्यवर्ती बँक माजी संचालक सुनंदा जीवतोडे, रवींद्र धोपटे, पुरुषोत्तम पावडे, देवानंद मोरे, निखिल हिवरकर, सुभाष दांदडे, साहेबराव ठाकरे, प्रफुल आसुटकर, संजय चिमुरकर, मिथुन ठाकरे, अंबादास टोंगे, गणेश काळे, प्रमोद मगरे, बाळू चिंचोलकर, रुपेश लभाने, सुरेश भायनकर, मंगेश देहारकर, संवर्ग विकास अधिकारी ज्ञानेश्वर सावसागडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मत्ते, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता झाडे, विस्तार अधिकारी प्रणव बक्षी यासह गावातील सरपंच उपसरपंच तसेच ग्रामस्थांची उपथिती होती.

वरोरा व भद्रावती तालुक्यातील विविध विकास कामांसाठी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची मागच्या आठवड्यात दौऱ्याची सुरुवात झाली. या दौऱ्यात मागील १० दिवस विविध गावात भेटी दिल्या व शेकडो कामाचे भूमिपूजन व लोकार्पण केले. त्यांनी सोमवारी (दि. 4) सेंबळ, आष्टी, वनोजा, एकोणा, नांद्रा, पांक्षुर्णी, कोहपरा, सोईट, नादेळी, येवती, वाघनख आणि जळका येथे विविध विकास कामांचं भुमीपूजन आणि लोकार्पण केले. या दौऱ्यात त्यांनी सेंबळ येथील स्मशानभूमीला संरक्षण भिंतीचे बांधकाम, आष्टी येथील गावापासून ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्याचे खडीकरण आणि मजबुतीकरण, वनोजा येथील खुल्या जागेत समाज भवनाचे बांधकाम, एकोणा येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबीर अंतर्गत श्रमदानातून खोदण्यात आलेल्या नालीचे पक्के बांधकाम, नांद्रा येथील स्मशानभूमी शेडचे बांधकाम, पांक्षुर्णी येथील श्री लक्ष्मण ठाकरे याच्या घरापासून श्री नामदेव चांमारे ते केशव ठाकरे ते हनुमान मंदिर ते सार्वजनिक विहीरीकडे जाणा-या रस्त्याचे सिमेंट कॉकिटीकरण, पांचुणी येथे आर.ओ. वॉटर एटीएम मशिन बसवणे, कोहपरा येथे मदुजी मेश्राम यांचे पासुन ते नदीकडे जाणाऱ्या सिमेंट कॉफिट रस्त्याचे बांधकाम, सोईट येथे आरओ वॉटर एटीएम मशिन बसवणे, नादेळी येथे आरओ वॉटर एटीएम मशिन बसवणे, माढेळी येथील मोहता यांचे शेतापासून ते आमडी रस्त्याचे खडीकरण आणि मजबुतीकरण, पारधीटोला (येवती) येथे झिबल पवार यांचे पासुन ते सुधाकर पवार पर्यंत सिमेंट कॉकिट रस्त्याचे बांधकाम, येवती येथे आरओ वॉटर एटीएम मशिन बसवणे आणि वाघनख येथे श्री अशोक पिसे यांचे शेतापासून ते संजय चिमुरकर यांचे शेतापर्यंत रस्त्याचे खड़ीकरण आणि मजबुतीकरण या कामांचं भुमीपूजन आणि लोकार्पण केलं.

दिनांक 05 डिसेंबर रोजी मोडबाळा-निमसडा-कोंढाळा-आटमूडर्डी ता वरोरा रस्ता इजिमा-9 मजबुतीकरण, मोहबाळा येथे स्मशानभूमी रस्त्याचे बांधकाम, निमसडा येथे जि.प.शाळेलगत ग्रामपंचायतच्या जागेवर समाज भवनाचे बांधकाम, निमसडा येथे श्री गावापासून ते श्री मोडक यांचे शेतापर्यंत रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण, निमसडा येथे श्री नामदेव मोहितकर ते सुभाश काळे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉकीट रस्त्याचे बांधकाम, निमसडा येथे स्मशान भुमी संरक्षण भित, निमसडा येथे श्री विनोद कोवे यांचे घरापासून ते श्री सुभाष महाडोळे यांचे घरापर्यंत सिमेंट कॉकिट रस्त्याचे बांधकाम, चिकणी येथे आरओ वॉटर एटीएम मशीन बसविणे, बोपापूर येथे अंगणवाडी इमारतीचे बांधकाम भूमिपूजन केले.

प्रतिभाताई धानोरकर यांनी या दौऱ्यात राबवण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यांनी सांगितले की, आमच्या तालुक्यात विकासाची गंगा वाहू लागली आहे. येत्या काळात आणखी अनेक विकास कामे राबवली जातील “वरोरा व भद्रावती तालुका हा माझा मतदारसंघ आहे. त्यामुळे या तालुक्यातील विकासासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. यामुळे तालुक्यातील विकासाला चालना मिळेल. मी या कामांसाठी मदत करत राहीन.”

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular