MLA Pratibhatai Dhanorkar felicitated the yogis selected for the International Yogasana Competition
चंद्रपूर :- इरा इंटरनॅशनल स्कूल नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ३५ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत वरोरा येथील एस.ए योगा इन्टीट्यूटच्या ८ योगपटूंची बँकॉक (थायलंड) येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेकरिता निवड झाली. यानिमित्त आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी या सर्व खेळाडूंचे वरोरा येथील जनसंपर्क कार्यालय येथे अभिनंदन केले.
या स्पर्धेत १६ राज्यातील ४०० योगपटूनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा पारंपरिक योगा, रिदमीक योगा, आर्टिस्टिक योगा या तीन विभागांमध्ये घेण्यात आली होती. योगपटू शौनक आमटे १ सुवर्ण पदक, राम झाडे २ सुवर्ण पदक, साहिल खापणे १ कांस्य, श्रीकांत घानवडे उपविजेता, स्वर्णिका नौकरकर २ सुवर्ण पदक, सई नेवास्कर १ सुवर्ण, गायत्री पाल १ रौप्य पदक, शर्वरी मिटकरी उपविजेती तसेच महाराष्ट्र संघाने जास्तीत जास्त पदके मिळवून उच्चांक प्राप्त केला आहे. तसेच एसए योगा इन्टीट्यूटचे प्रशिक्षक तथा संस्थापक स्वप्नील पोहनकर, अनिकेत ठक यांच्या मार्गदर्शनाखाली विजेते सर्व योगपदक नियमित सरावाचे धडे घेत आहेत.
ही स्पर्धा मार्च २०२४ मध्ये होणार असून, या यशाबद्दल आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, वरोरा येथील एसए योगा इन्स्टिट्यूटचे योगपटू नेहमीच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश संपादन करत आहेत. या यशामुळे वरोरा शहराचे नाव देशभरात उज्ज्वल झाले आहे. या योगपटूंचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
काही महिन्यांपूर्वी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडून वरोरा येथील एसए योगा इन्स्टिट्यूटच्या १५ योगपटूंना योग्य किट उपलब्ध करून देण्यात आले होते. त्या किटच्या फायदा या खेळाडूंना झाल्याने खेळाडूंनी देखील आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे विशेष आभार मानले.