MLA Kishore Jorgewar visited the family whose house was damaged by fire.
चंद्रपूर :- गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने कुटांवार यांचे घर जळाल्याची घटना घुग्घूस शहरतील इंदिरा नगर येथे सोमवारला घडली होती. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी पिडीत कुटुंबीयांची भेट घेत आर्थिक मदत केली आहे.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे घुग्घूसचे नेता इमरान खान, प्रेम गंगाधरे, घुग्घूस शहर महिला संघटिका उषा आगदारी, स्वप्नील वाढई, राजू सुर्यवंशी, मयुर केवट, राजू नातर, सुरज मोरपाका, बबीता निहाल, भारती सोदारी, नविन मोरे, सुरेखा तोडासे, संध्या जगताप, माया मांडवकर आदीची उपस्थिती होती.
घुग्घुस शहरातील इंदिरा नगर येथील संतोष कुंटावार यांच्या आई गॅसवर स्वयंपाकाचे भांडे ठेवून त्या बाहेर बसल्या होत्या. या दरम्यान गॅस सिलेंटर लिकेज Gas Cylinder Leakage झाल्याने सिलेंटरच्या पाईपाने पेट घेतला. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील सर्व सामान जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशमनच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर आग विझविण्यात आली. मात्र तोवर घरातील सामान जळून खाक झाले होते.
दरम्यान आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस दौऱ्यावर असतांना सदर घराची पाहणी करत कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी कुंटावार कुटुंबीयांना आर्थिक मदत केली असून शासनातर्फे मिळणारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयन्त करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. याप्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या घुग्घूस येथील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.