MLA Kishore Jorgewar showed ‘Jun furniture’ film to children and seniors: 800 citizens experienced the problems of senior citizens through the film
चंद्रपूर :- जेष्ठ नागरिकांच्या समस्यांवर आधारित जुनं फर्निचर या सिनेमाचा शो आमदार किशोर जोरगेवार यांनी वयोवृध्द नागरिकांना दाखविला. जेष्ठ नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आज आपण आठवड्याभरात दुस-यांदा जेष्ठ नागरिकांना हा सिनेमा दाखविला असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar म्हणाले. हा सिनेमा बघून जेष्ठांच्या डोळ्यात पाणी तरडले. यावेळी राधाकृष्ण सिनेमागृहात जेष्ठ आणि युवक अशा जवळपास 800 नागरिकांना हा सिनेमा पाहिला. MLA Kishore Jorgewar showed ‘Jun furniture’ film to children and seniors
आमदार किशोर जोरगेवार हे नेहमी अभिनव उपक्रम राबवित समाजामध्ये सक्रियरित्या काम करत असतांचे अनेक उदाहरणे आजवर समोर आली आहे. यापूर्वी विविध क्षेत्रात कार्यरत जेष्ठ गुरुंचा त्यांनी सत्कार केला होता. ज्येष्ठ नागरिक संघ सर्व सोयी सुविधायुक्त करण्यासाठी मोठा निधी त्यांच्या वतीने शहरातील 7 ज्येष्ठ नागरिक संघाला उपलब्ध करुन दिला आहे.

दरम्यान त्यांनी मिराज सिनेमागृह येथे जुनं फर्निचर या सिनेमाचा दुपारचा पूर्ण शो शहरातील जेष्ठ नागरिकांसाठी बुक केला होता. मात्र यावेळी आमच्या पाल्यांनाही हा सिनेमा दाखवा अशी आग्रही विनंती जेष्ठ नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांना केली होती. त्यांनतर रविवारी शहरातील राधाकृष्ण सिनेमागृहात आमदार किशोर जोरगेवार यांनी 800 मुल आणि पालकांना हा सिनेमा दाखविला आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार हे सुध्दा सिनेमागृहात उपस्थित होते.
सामाजिक विषयाला घेऊन हा सिनेमा प्रकाशित करण्यात आला आहे. जेष्ठांच्या व्यथा, वेदना, आशा, आकांशा या सिनेमाच्या माध्यमातून पूढे आल्या आहेत. आयुष्यभर सेवा केल्या नंतर अपेक्षा पूर्ण होत नाही. त्यांना एकाकी जीवन जगाव लागत. जेष्ठांच्या आवडी निवडी पूरविण्याच्या दुस-या पिढीकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाही. अशा अनेक बाबी या सिनेमातून समोर आल्या असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.