Thursday, February 22, 2024
Homeअपघातवाघाच्या हल्यात ठार झालेल्या मनोहर वाणी यांच्या कुटुंबियांची आमदार किशोर जोरगेवार यांनी...

वाघाच्या हल्यात ठार झालेल्या मनोहर वाणी यांच्या कुटुंबियांची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भेट

MLA Kishore Jorgewar met the family of Manohar Wani, who was killed in a tiger attack

◆ कुटुंबाला केली आर्थिक मदत, उर्वरित शासकीय मदत तत्काळ मिळावी यासाठी करणार प्रयत्न

चंद्रपूर :- जूनोनाच्या जंगला लगत असलेल्या शनी मंदिरात गेलेल्या 53 वर्षीय मनोरह वाणी यांचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला होता. दरम्यान आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतक मनोहर वाणी यांच्या बाबूपेठ येथील राहत्या घरी सांत्वनपर भेट देत परिवाराला आर्थिक मदत केली.
यावेळी मृतकाची पत्नी उज्वला वाणी, वडील विक्रम वाणी व इतर कुटुंबातील सदस्यांसह वन परिक्षेत्र अधिकारी जि. आर. नागमकर, यंग चांदा ब्रिगेडचे अमोल शेंडे, राशिद हुसेन, अब्बास शेख, अशोक अक्केवार, महेश वासलवार यांची उपस्थिती होती.

रविवारी सकाळच्या सुमारास जुनोना रोडच्या कडेला असलेल्या शनी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेल्या बाबुपेठ येथील रहिवासी मनोहर वाणी यांचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभागाने घटनास्थळी दाखल होत. मृतदेह शवविच्छेदना करिता जिल्हा सामान्य रुग्णालायत दाखल केला होता. दरम्यान आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतक मनोहर यांच्या घरी सांत्वतपर भेट दिली. यावेळी त्यांनी मृतकच्या पत्नी उज्वला वाणी यांना आर्थिक मदत केली. सोबतच शासनातर्फे मिळणार असलेली मदत लवकर मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत मृतक मनोहर यांचा शवविच्छेदन अहवाल व इतर कागदपत्रे वनविभागाला लकवर उपलब्ध करुन देण्याच्या सुचना केल्या आहे. सदर कागदपत्रे प्राप्त होताच शासनाची उर्वरित आर्थिक मदत देण्याच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नागमकर यांना केल्या आहे. मृतकाच्या पत्नीला वन विभागाने कंत्राटी पद्धतीवर काम देण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular