Sunday, December 8, 2024
HomeHealth10 कोटी रुपयातुन तयार होत असलेल्या घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयाची आमदार किशोर...
spot_img
spot_img

10 कोटी रुपयातुन तयार होत असलेल्या घुग्घुस येथील ग्रामीण रुग्णालयाची आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी.

MLA Kishore Jorgewar inspected the rural hospital at Ghugghus which is being built at a cost of Rs 10 crore.                          Soon the hospital will join the service of citizens

चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनच्या 10 कोटी रुपयातून घुग्घुस येथे ग्रामीण रुग्णालयाचे काम पुर्ण होत आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी सदर कामाची पाहणी केली असून उरलेली अनुषंगिक कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सुचना केल्या आहे. रुग्णालयाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून लवकरच सदर रुग्णालय सेवेत रुजू होणार आहे. MLA Kishor Jorgewar inspected the rural hospital

यावेळी उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, सहायक शाखा अभियंता रवी ढोरे, यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे नेते इमरान खान, प्रेम गंगाधरे, मुन्ना लोढे, स्वप्निल वाढई, मयुर कलवल, रमन वान्ड्रा, इरशाद शेख, शंकर रनदिवे, जाकी अनवर, घुग्घूस बहुजन महिला आघाडी प्रमुख उषा अगदारी, आदिवासी महिला प्रमुख उज्वला उईके, ज्योती बावरे, जोत्स्ना मस्के, सुरेखा तोडासे, सुनिता चुने, शारदा पोनाल, मनिषा मेश्राम, पुष्पा नक्षीने, सुनिता पारधे आदींची उपस्थिती होती.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपूराव्या नंतर घूग्घूस ग्रामपंचायतीचे रुपांत्तर नगर परिषद मध्ये करण्यात आले आहे. या नगर परिषदेला तिन वर्ष पुर्ण होत आहे. सोबतच येथील विकास कामांनाही आता गती मिळाली असून सर्वसमावेशक असा विकास येथे केल्या जात आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी या शहराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून येथील विकासकामे प्रगतीपथावर आहे. 2019 च्या बजेटमध्ये येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले होते. मात्र निधी उपलब्ध होत नसल्याने सदर काम थंडावले.

दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर विषय उचलून धरला होता. या रुग्णालयाला निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचा शासन दरबारी सतत पाठपूरावा सुरु होता. अखेर 2021 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने सदर रुग्णालयाच्या बांधकामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. सदर निधीतून येथील काम सुरु आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर निर्माणाधीन रुग्णालयाच्या कामाची काल शुक्रवारी पाहणी केली.

उत्तम दर्जाचे काम येथे झाले असून केवळ अनुषंगिक आणि विद्युत जोडणीचे कामे येथे बाकी आहे. उर्वरित कामेही जलद पुर्ण करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. सोबतच रुग्णालय सभोवताल सौंदर्यीकरण करत रुग्णवाहिकांसाठी शेड तयार करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबधित अधिका-यांना केल्या आहे.

3 कोटी 50 लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या कामाची पाहणी

घूग्घूस येथील सिमेंट काँक्रिट रस्त्यांसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी शहर विकास निधी अंतर्गत 3 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला होता. सदर निधीतून येथील 17 रस्त्यांचे कामे केल्या जात आहे. या रस्त्यांच्या कामाची ही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. यातील ११ रस्त्यांचे कामे पूर्ण झाली असून उर्वरित रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. सदर रस्तेही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular