Thursday, November 30, 2023
Homeआमदारआमदार किशोर जोरगेवार यांनी अम्मा का टिफिन परिवारासह दिवाळी केली साजरी ;...

आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्मा का टिफिन परिवारासह दिवाळी केली साजरी ; स्नेहमिलन व आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे आयोजन

MLA Kishore Jorgewar celebrated Diwali with Amma Ka Tiffin family ; Organizing get together and health camp program                               चंद्रपूर :- आज पासुन दिवाळीला सुरवात झाली आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अम्मा का टिफिन परिवारासोबत दीपावली स्नेहमिलन व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अम्माचा टिफिन परिवारातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार, गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार, कल्याणी किशोर जोरगेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनल आश्राम, डॉ. विवेक देशमुख, डॉ. आदित्य मेहेत्रे, डॉ. दर्शनी मेश्राम, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंढारे, सायली येरणे, कौसर खान, भाग्यश्री हांडे, शमा काजी, वैशाली मेश्राम, वैशाली मद्दीवार, आशा देशमुख, अस्मिता डोणारकर, माला पेंदाम, कल्पना शिंदे, विमल काटकर, सोनाली आंबेकर, दुर्गा वैरागडे, स्मिता वैद्य, अनिता झाडे, वंदना हजारे, चंदा ईटनकर आदींची उपस्थिती होती.

‘राहो न कोणी उपाशी अम्मा का टिफिन येई घराशी’ असा संकल्प करत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने अम्मा का टिफिन उपक्रम सुरु करण्यात आला आहे. सदर उपक्रमा अंतर्गत अत्यंत गरजू व्यक्तीला घरपोच जेवणाचा डब्बा पोहचविला जात आहे. आज या परिवातील सदस्यांसोबत आमदार किशोर जोरगेवार यांनी दिवाळी साजरी केली.
यावेळी दीपावली स्नेहमिलन आणि आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रक्तदाब, मधुमेह व इतर वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्यात. यावेळी नि:शुल्क औषधोपचार करण्यात आला. आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्मा टिफिन परिवारातील सदस्यांची भेट घेत त्यांना दिवाळी निमित्त फराळ व भेट वस्तू देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. अम्मा का टिफिन हा उपक्रम यशस्वी करण्यामागे अनेकांचे परिश्रम आहे. याच परिश्रमामुळे खंड न पडता आपण नियमित हा उपक्रम सुरु ठेवू शकलो. आता हा परिवार मोठा झाला आहे. त्यामुळे आपल्या जबाबदा-याही वाढल्या आहेत. या परिवारातील प्रत्येक सदस्य आमच्यासाठी महत्वाचा असुन त्यांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, येथील सदस्यांच्या आरोग्याकडे आपण विशेष लक्ष देत आहोत. आज आपल्यासह दिवाळी साजरी करतांना आनंद होत असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

या कार्यक्रमात यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular