Sunday, April 21, 2024
HomeEducationalमुलींच्या गटात अमरावती संघाची बाजी : आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने राज्‍यस्‍तरीय...

मुलींच्या गटात अमरावती संघाची बाजी : आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने राज्‍यस्‍तरीय आमंत्रित हॉकी स्‍पर्धा (मुली)

MLA Cup: Amravati team wins in girls group
MLA Sudhakar Adbale State Invitational Hockey Tournament

चंद्रपूर : आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात थाटात पार पडलेल्‍या ‘आमदार चषक’ राज्‍यस्‍तरीय आमंत्रित हॉकी स्‍पर्धेत मुलींच्या गटात अंतिम सामन्‍यात नागपूर संघाचा ३-१ ने पराभव करीत अमरावती संघाने बाजी मारली.

हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर व डेव्‍हलपमेंट ॲन्‍ड रिसर्च एज्‍युुकेशन सोसायटी (ड्रिम) चंद्रपूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने राज्‍यस्‍तरीय आमंत्रित हॉकी स्‍पर्धा (मुली) लोकमान्य टिळक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, जिल्‍हा स्‍टेडीयमच्‍या बाजूला चंद्रपूर येथे पार पडली. या स्‍पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मुलींचे संघ सहभागी झाले होते.

मुलींच्या गटात नागपूर आणि अमरावती संघात अंतिम सामना रंगला. अतिशय चुरशीच्या सामन्‍यात अमरावती संघाने नागपूर संघाचा ३-१ ने पराभव केला. तर तिसऱ्यास्‍थानासाठी चंद्रपूर – यवतमाळ संघात सामना झाला. यात चंद्रपूर संघाने बाजी मारली.

मुलींच्या गटात प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्‍या संघाला ट्राफी, रोख आणि मेडल देऊन आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्‍ते सन्‍मानित करण्यात आले. तर उत्‍कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेस्‍ट स्‍कोरर, बेस्‍ट किपर, बेस्‍ट फॉरवर्ड, बेस्‍ट डिपेंडर, बेस्‍ट प्‍लेअर ऑफ फायनल मॅच, बेस्‍ट प्‍लेअर ऑफ द टुर्नामेंट म्‍हणून खेळाडूंना गौरविण्यात आले.

यावेळी अरविंद दिक्षीत, सुरेंद्र अडबाले, प्रा. रवी झाडे, दिनकर अडबाले, सचिन मोहीतकर, प्रेम गावंडे, रुपेशसिंह चौव्हाण, अभिजीत दुर्गे, निलेश शेंडे, पंकज शेंडे आदींची उपस्‍थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular