Tuesday, November 12, 2024
HomeLoksabha Electionआमदार बच्चू कडूंच्या 'प्रहार' पदाधिकाऱ्यांचा चंद्रपूर, गडचिरोलीतही महायुतीच्या प्रचाराला विरोध
spot_img
spot_img

आमदार बच्चू कडूंच्या ‘प्रहार’ पदाधिकाऱ्यांचा चंद्रपूर, गडचिरोलीतही महायुतीच्या प्रचाराला विरोध

MLA Bachu Kadu’s ‘Prahar’ office-bearers oppose Mahayutti’s campaign in Chandrapur, Gadchiroli

◆ राणा दाम्पत्याकडून बच्चू कडूचा अपमान सहन करणार नाही

चंद्रपूर :- अमरावतीमध्ये विद्यमान खासदार नवनीत राणा Navneet Rana यांच्या उमेदवारीला महायुतीतील आमदार बच्चू कडू Bachhu Kadu यांनी विरोध केला. यानंतरही नवनीत राणा यांना भाजपात प्रवेश देत उमेदवारी देण्यात आली.

राणा दाम्पत्याकडून वारंवार आमदार बच्चू कडू यांची बदनामी केली जात आहे. त्यामुळे अमरावतीत राणांविरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने स्वतंत्र उमेदवार दिला आहे. अन्य ठिकाणीसुद्धा प्रहारच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये राणा दाम्पत्याविरोधात रोष असून, राणा यांना उमेदवारी देणाऱ्या भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करणार अशी भूमिका प्राहारच्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केली आहे. MLA Bachu Kadu’s ‘Prahar’ office-bearers oppose Mahayutti’s campaign in Chandrapur, Gadchiroli

बालविवाह.. लग्न घरातून वर व कुटुंब ताब्यात

मंगळवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात प्रहार जनशक्ती पक्षाच्या चंद्रपूर, गडचिरोली लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आमदार बच्चू कडू यांच्या समर्थनात भूमिका घेत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याकडून वारंवार होणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्या बदनामीचा निषेध नोंदविला. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांचा रुटमार्च

आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारला पाठिंबा दिला आहे. ते सत्तेत आहेत. असे असताना सत्ताधारी पक्षातीलच एका घटक पक्षाने दुसऱ्या घटक पक्षाच्या आमदाराची बदनामी करणे योग्य नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, Devendra Fadanvis भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या उपस्थितीत नवनीत राणांकडून आ. बच्चू कडूंची होणारी बदनामी खपवून घेणार नाही, असा इशारा देत त्यांना साथ देणाऱ्या भाजपाचे या लोकसभा निवडणुकीत काम करणार नाही अशी भूमिका यावेळी दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मांडली. चंद्रपूर जिल्ह्यात कलम 37 (1),(3) लागू

11 एप्रिल रोजी आ. बच्चू कडू यांच्याशी कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा याबाबत चर्चा होणार आहे. यानंतर या दोन मतदार संघात पक्षाची काय भूमिका असेल हे स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शेरखान पठाण, निखिल धार्मिक, अमोल काटकर, हरिश्चंद्र ढेंगरे, प्रवीण वाघे आदी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular